*शिवसह्याद्री सोशल फाउंडेशन तर्फे दुर्गम भागात शालेय साहित्याचे वाटप*…शंकरराव भेलके महाविद्यालय अर्थशास्त्र विभाग नसरापूर व शिवसह्याद्री सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त एकलगाव, कुसार पेठ, सिंगापूर, मोहरी ता. वेल्हे जिल्हा पुणे येथे शिवसह्याद्री सोशल फाउंडेशन तर्फे , तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये शैक्षणिक साहित्य, कपडे, खाऊ वाटप केल्याची माहिती शिवसह्याद्री सोशल फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात आली. फाउंडेशनच्या वतीने स्थानिक महिलांना साडी- चोळी, पुरूष मंडळींना कपडे देण्यात आले. शिवसह्याद्री सोशल फाउंडेशन मागील दहा वर्षांपासून हे सामाजिक कार्य अव्याहतपणे करत आहे असं फाउंडेशन तर्फे सांगण्यात आले. या वेळी वेल्हे विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष श्री.गणेश गिरंजे, डॉ. सचिन घाडगे, प्रा. महेश कोळपे प्रा माऊली कोंडे प्रा जाधवर डी एस उपस्थित होते.
शिवसह्याद्री सोशल फाउंडेशन तर्फे दुर्गम भागात शालेय साहित्याचे वाटप.
