मुंबईत ५० पत्रकारांना अटक* राज्यभरात पत्रकार संरक्षण कायद्याचे होळी करण्यात आली*राज्यात अनेक संघटनाचे निषेध आंदोलन यशस्वी

*मुंबईत ५० पत्रकारांना अटक* *राज्यभरात पत्रकार संरक्षण कायद्याचे होळी करण्यात आली**राज्यात अनेक संघटनाचे निषेध आंदोलन यशस्वी*महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा असतानाही त्याची कठोरपणे अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ले पुन्हा वाढले आहेत. त्यामुळे सर्वार्थाने कुचकामी ठरलेल्या या कायद्याची आज राज्यभरात 13 पत्रकार संघटनांनी पत्रकार संरक्षण कायद्याची होळी केली. दरम्यान, मुंबईत हुतात्मा चौक आणि मुंबई मराठी पत्रकार संघाच्या आवारातही पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यात आली. पोलिसांनी कारवाई करत 50 पत्रकारांना अटक केली.महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा असला तरी त्याची अंमलबजाकणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ल्यांची संख्या चिंता वाटावी एवढी वाढली आहे. राज्यात चार वर्षांत 225 पत्रकारांवर हल्ले झाले असले तरी केवळ 37 प्रकरणांतच पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावले गेले. चार वर्षांत या कायद्यान्वये एकाही आरोपीला शिक्षा झालेली नाही. त्यामुळे कायद्याचा धाक उरला नसल्याने पत्रकारांकरील हल्ल्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. पाचोऱयात स्थानिक आमदार किशोर पाटील यांनी पत्रकारास शिवीगाळ केली आणि नंतर आपल्या गुंडाकरवी पत्रकाराकर हल्ला चढविला. ही चित्रफित महाराष्ट्राने पाहिली असतानाही आमदारांकर किंवा त्यांच्या हल्लेखोर गुंडांवर देखील पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावले गेले नाही. असे प्रकार वारंवार आणि सर्वत्र घडत असल्याने पत्रकारांकरील हल्ले पुन्हा वाढले आहेत. हा कायदाच कुचकामी ठरला असल्याने या कायद्याची आज महाराष्ट्रभर होळी करण्यात आली.मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला किरोधी कृती समिती, मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई प्रेस क्लब, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए, बीयूजे, क्राईम रिपोर्टर असोशिएशन, पॉलिटिकल फोटो जर्नलिस्ट असोसिएशन, बॉम्बे न्यूज फोटोग्राफर असोसिएशन, मुंबई महानगरपालिका पत्रकार संघ, म्हाडा पत्रकार संघ, उपनगर पत्रकार संघाचे प्रतिनिधी आंदोलनात सहभागी झाले होते.मुंबईत पत्रकारांवर दडपशाहीमुंबईत हुतात्मा चौकात आंदोलन करणाऱया एस. एम. देशमुख, किरण नाईक, शरद पाबळे, दीपक कैतके, राजा आदाटे, नरेंद्र काबळे, संदीप चव्हाण, दीपक पवार, राजन पारकर, विनायक सानप, विशाल परदेशी यांच्यासह पन्नासहून अधिक पत्रकारांना आज पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली. आंदोलनाआधी पत्रकारांच्या वतीने हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!