धुळे जिल्ह्यातील दोन शिक्षकांची दिल्ली येथे प्रशिक्षणासाठी निवड:

*नेर:* *धुळे जिल्ह्यातील दोन शिक्षकांची दिल्ली येथे प्रशिक्षणासाठी निवड:* *नेर:* धुळे जिल्ह्यातील दोन शिक्षकांची भारत सरकारच्या कला व सांस्कृतिक विभागाच्या वतीने दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.श्री योगेश सखाराम कोळी जिल्हा परिषद शाळा नेर ता.धुळे व श्री दिपक रमेश जाधव जिल्हा परिषद शाळा रामी ता.शिंदखेडा असे या दोन प्राथमिक शिक्षकांची नावे आहेत.या राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील दहा शिक्षकांची निवड झालेली आहे.तसेच इतर राज्यातून देखील या प्रशिक्षणासाठी निवड झालेली आहे.याबाबत शिक्षण उपसंचालक डॉ.नेहा बेलसरे यांनी पत्र दिले आहे.वस्तू संग्रहालयाची शालेय शिक्षणातील भूमिका हा या प्रशिक्षणाचा विषय आहे.दिनांक २१ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट दरम्यान सदर प्रशिक्षण होणार आहे.या निवडीबद्दल शिक्षणाधिकारी श्री राकेश साळुंके साहेब, गटशिक्षणाधिकारी धुळे श्रीमती सुरेखा देवरे, गटशिक्षणाधिकारी शिंदखेडा डॉ श्री सी.के.पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी श्री संजीव विभांडिक, शिक्षण विस्तार अधिकारी श्री डी.एस. सोनवणे, केंद्रप्रमुख श्रीमती अपर्णा जोशी, केंद्रप्रमुख श्री प्रेमानंद उपाचार्य, मुख्याध्यापक श्री रामभाऊ पाटील व श्री निलेश पाटील यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!