सांगवी प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी व सपोनि जयेश खलाणे व उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत: बिरसा फायटर्सची मागणी*

*सांगवी प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी व सपोनि जयेश खलाणे व उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत: बिरसा फायटर्सची मागणी**सांगवी येथील उद्रेक म्हणजे आदिवासी समाजाचा भाजपा आमदारांबद्धल असलेला राग:सुशिलकुमार पावरा*शहादा:सांगवी ता.शिरपूर जिल्हा धुळे येथे ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त लावण्यात आलेले आदिवासी क्रांतिकारकांचे बॅनर चारण समाजातील काही लोकांनी फाडल्यानंतर उद्रेक झाला.हा उद्रेक म्हणजे आमच्या आदिवासी समाजाचा भाजपा आमदार ,खासदार,लोकप्रतिनिधींविरोधात असलेली मनातली खदखद , राग ,क्रोध आहे. या उद्रेकाला तेथील भाजपाचे विद्यमान व माजी आमदार जेवढे जबाबदार आहेत, तेवढेच जबाबदार तेथील पोलीस प्रशासन सुद्धा आहे.कारण १० ऑगस्ट ला आदिवासी क्रांतिकारकांचे बॅनर फाडणा-यांवर,जाब विचारायला गेलेल्या ३ आदिवासी तरुणांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली.पोलिसांनी आपले काम केले नाही.त्यातल्या त्यात तेथील भाजपा आमदार काशीराम पावरा यांनी या प्रकरणात जखमी झालेल्या ३ आदिवासी तरुणांची विचारपूस न करता,आदिवासी समाजाची भेट न घेता,परस्पर चारण समाजातील लोकांना भेट दिली.यावरून या भाजपा आमदाराला आदिवासी समाज महत्वाचा वाटत नाही,त्यांना आपला पक्ष महत्वाचा वाटतो,दुस-या समाजाची लोक महत्वाची वाटतात,असे दिसून येते. भाजपा आमदाराच्या या कृतीनंतर साहजिकच आहे,आमच्या आदिवासी बांधवांनी आंदोलन केले,रास्ता रोको केले.खरा मुद्दा हा होता की,पोलिसांनी बॅनर फाडणा-यांवर व हल्ले करणाऱ्यांवर योग्य वेळी कारवाई केली असती तर रास्ता रोको,वाहनांची तोडफोड, अटक करणे हा अनर्थ टळला असता.भाजपाचे माजी आमदार अमरिशभाई पटेल व विद्यमान आमदार काशीराम पावरा हे ही दंगल आदिवासी संघटनांनी घडवून आणली आहे,असा बिनबुडाचा आरोप केला आहे.ही दंगल भाजपाच्या पुढा-यांनी घडवून आणली आहे,हे षडयंत्र राजकीय पुढा-यांचे आहे.तेथील भाजपा आमदार, पुढा-यांमुळे ही दंगल घडून आली आहे,याला जबाबदार तेथील भाजपाचे लोकप्रतिनिधीच आहेत, हे आमचे स्पष्ट मत आहे,असे सुशिलकुमार पावरा म्हणाले. शिरपूर तालुक्यात आजही १६ आदिवासी पाड्यांत झोपडीत जिल्हा परिषदच्या शाळा भरतात,शाळेला पक्की इमारत नाही.तेव्हा अमरिशभाई पटेल व काशीराम पावरा यांनी विकासाकडे लक्ष द्यावे.उगीच आमच्या आदिवासी निर्दोष तरुणांवर गुन्हे दाखल करणे,अटक करणे,आमच्या बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांचे मोबाईल जप्त करणे,गुन्हे दाखल करणे,अटक करणे असा नाहक त्रास देण्याचे काम करू नयेत.ही मनमानी आम्ही खपवून घेणार नाहीत. मणिपूर येथील घटनेनंतर आमच्या आदिवासी समाजात भाजपा सरकारविरोधात, भाजपा आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींविरोधात प्रचंड राग आहे आणि तो राग अशा घटनेतून व्यक्त होत आहे.९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनी आम्ही संपूर्ण आदिवासी समाजाने मणिपूर घटनेचा निषेध व्यक्त केला आणि त्याविरोधात काही बिनडोक आदिवासी आमदार, खासदार,कार्यकर्ते नाचले.या नाचणा-यांना लाज वाटली पाहिजे.आपल्या आदिवासी समाजाचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असल्यास या भाजपा आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींना मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवा, यांना सत्तेतून, पदावरून हाकला,तरच आपले अस्तित्व टिकून राहील. लकीभाऊ जाधव यांनी १८ ऑगस्ट ला सांगवी प्रकरणात आदिवासी बांधवांना न्याय मिळावा,म्हणून मोर्चा आयोजित केला होता,त्या मोर्चात आम्ही एकदिलाने शामिल होणार होतो.परंतु पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर मोर्चा झाला नाही,तरीसुद्धा या प्रकरणात पोलिसांनी निर्दोष आदिवासी तरुणांवर गुन्हे दाखल करणे,त्यांना अटक करणे,हे धरपकडचे सत्र बंद केले पाहिजे.तेथील राजकीय पुढा-यांनी सुद्धा आपली हुकुमशाही थांबवली पाहिजे.नाहीतर आम्ही बिरसा फायटर्स संघटनेतर्फे याविरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहेत. सांगवी प्रकरणाला जबाबदार असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे व उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्यावरसुद्धा गुन्हे दाखल व्हायला पाहिजे,त्यांची तात्काळ बदली झाली पाहिजे,या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे व ख-या समाजकंटकांवर कारवाई झाली पाहिजे,अशी मागणी आम्ही केली आहे. अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!