धुळे जिल्ह्यात इंडिया गटाची बैठक संपन्न
प्रतिनिधी गोपाल कोळी
1)धुळे जिल्ह्यात इंडिया गटाची बैठक संपन्न.
2)जिल्हापातळीवरील महाराष्ट्रातील प्रथम बैठक धुळ्यात संपन्न.
3)इंडिया गट धुळे महानगरपालिकेच्या विरोधात हजारो लोकांचा विराट मोर्चा काढणार.
4) जिल्ह्यातील सर्व निवडणुका एकत्र लढविणार.
धुळे जिल्हा पातळीवरील पहिली इंडिया गटाची तथा महाविकास आघाडीची बैठक रणजीत राजे भोसले यांच्या देवपूर कार्यालयात स्वातंत्र्यदिनी संपन्न झाली.
महाराष्ट्रात एखाद्या जिल्ह्यात इंडिया गटाची बैठक घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी,मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, समाजवादी पार्टी, संभाजी ब्रिग्रेड आदी पक्ष सहभागी झाले होते. बैठकीचे प्रास्ताविक राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकेत म्हटले की, जिल्ह्यामध्ये सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री शामकांत सनेर व शिवसेनेचे माजी आमदार शरद पाटील यांनी म्हटले की,भाजपचीं सत्ता असलेली महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद तथा नगरपरिषद या सर्व ठिकाणी एकत्र येऊन भाजपाच्या भ्रष्टाचार व हुकूमशाही विरोधात एकत्र काम करू. बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे रणजीत राजे भोसले,शिवसेनेचे माजी आमदार शरद पाटील,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड एल. आर.राव, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष हितेश पवार, संभाजी ब्रिगेडचे हेमंत भडक, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे यांनी मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले. सदर बैठकीमध्ये विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर बैठकीमध्ये भाजपाच्या एकाअधिकार, हुकूमशाही व भ्रष्टाचाराच्या विरोधात एकत्र लढणे, जिल्हा व तालुका पातळीवर इंडिया गटाची बांधणी करून बैठका घेणे, जिल्ह्यातील या पुढील सर्व निवडणुका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद,नगर परिषद,सहकारी निवडणुका एकत्रित लढविणे, सर्वांमध्ये समन्वय साधण्यासाठी सर्व पक्षाची एक कमिटी बनविणे असे निर्णय घेण्यात आले.पुढील बैठक व्यापक स्वरूपाची घेण्याचे ठरले. यावेळेस धुळे जिल्हा इंडिया गटाचे नेतृत्व आमदार श्री कुणाल बाबा पाटील यांनी करावे असा प्रस्ताव शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख श्री महेश मिस्तरी यांनी ठेवला. तसेच यानंतर इंडिया गटातील सर्व पक्ष मार्फत धुळे महानगरपालिकेतील भाजपाच्या भ्रष्ट कारभारा विरोधात हजारो लोकांचा विराट मोर्चा काढण्याचे ठरले.बैठकीमध्ये सर्वांनी आपआपल्या पक्षाची भूमिका मांडली. आपापसातली मतभेद विसरून एकमेकांमध्ये समन्वय साधनाचे ठरले.
यावेळेस राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री शाम सनेर,शहरध्यक्ष डॉ अनिल भामरे, प्रदेश सरचिटणीस श्री युवराज करंकाळ, माजी विरोधी पक्षनेते श्री साबीर शेख, मुकेश खरात शिवसेनेमार्फत माजी आमदार शरद पाटील,जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, महानगरप्रमुख डॉ सुशील महाजन,उपजिल्हाप्रमुख श्री किरण जोंधळे,ग्रामीण जिल्हाप्रमुख श्री हेमंत साळुंखे,प्रवीण पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष श्री रणजीत राजे भोसले, अल्पसंख्यांक आघाडीचे राष्ट्रीय खजिनदार जोसेफ मलबारी,शिंदखेडा तालुका अध्यक्ष डॉ कैलास ठाकरे, शिरपूर तालुका अध्यक्ष श्री रमेश करणकाळ, धुळे शहर विधानसभा अध्यक्ष श्री गोरख शर्मा, पदवीधरांचे प्रदेश उपाध्यक्ष श्री जितू पाटील, धुळे तालुक्याचे विनोद बच्छाव,उपाध्यक्ष रईस काझी, VJNT आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री राजू डोमाळे,दत्तू पाटील, गुलाब पाटील,आम आदमी पार्टीचे जिल्हाअध्यक्ष हितेश पवार, कम्युनिस्ट पक्षाचे कॉमेड एल. आर. राव, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे श्री पोपटराव चौधरी, संभाजी ब्रिगेडचे श्री हेमंत भडक, शाम निरगुडे समाजवादी पार्टीचे ॲड इमरान शेख आदी उपस्थित होते. पुढील बैठकीचे नियोजन लवकरच कळविले जाईल. अशी माहिती प्रथम बैठकीचे आयोजक श्री रणजीत राजे भोसले यांनी अशी माहिती दिली.