आदर्श शिक्षकाचा गावाकडून सन्मान

*आदर्श शिक्षकाचा गावाकडून सन्मान* शहादा तालुक्यातील चिखली दिगर ग्रामस्थांनी नवीन पायंडा पाडून शैक्षणिक वातावरणात नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. चिखलीदिगर ता.शहादा येथे श्री.रघुनाथ बळसाणे सरांनी विषय शिक्षक या पदावर कार्यरत असतांना शाळेतील विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुणवत्ता पूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून दिल्यामुळे चिखलीदिगर गावातील अनेक विद्यार्थी अतिशय हुशार व बोलके झालेत याचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे “याची देही याची डोळा”…..पालकांनी घेतल्यामुळे श्री बळसाणे सरांच्या सन्मान करण्याचे गावातील ग्रामस्थांनी ठरवले होते.त्यातच श्री बळसाणे यांना बढती मिळाल्याने त्यांची पदोन्नती मुख्याध्यापक म्हणून धडगाव तालुक्यातील नवे धडगाव या शाळेवर नियुक्ती झाली.त्यांच्या बढती प्रक्रियेने गावातील विद्यार्थी व ग्रामस्थांना जरी बरे वाटले नाही तरी चिखलीदिगर ग्रामपंचायत व जि प शाळा चिखली दिगर शाळेतील विद्यार्थी पालकांनी व शिक्षकांनी विषय शिक्षक श्री रघुनाथ गंभीर बळसाने यांचा यथोचित सन्मान घडवून आणला. यावेळी श्री बळसाणे सर व विद्यार्थी अतिशय भावूक झाले होते. ह्या कार्यक्रमाच्या पुढाकारात जहागिरदार कुटूंबातील व गावाचे प्रथम नागरिक सरपंच चंद्रसिंग सुमेरसिंग नाईक, मा. सभापती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष डॉ. सुरेश नाईक, निवृत्त मुख्याध्यापक गिरधर पाटील सर, आश्रम शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक मोहनसिंग नाईक, इब्टा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दादाभाई पिंपळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पिंपळे सरांनी उपस्थित बळसाणे सर यांचा जीवनपट व शैक्षणिक कार्याविषयी माहिती दिली.त्यात ते म्हणाले की, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वडिलांची इच्छा नसताना गुरुजींच्याअग्रहास्तव शिक्षण घेतलं म्हणून बळसाणे सर नेहमी मुलांमध्ये स्वतःला शोधत असतात .म्हणून जिथे जिथे जातात तिथे तिथे आपला ठसा उमटवत असतात. तसेच गिरधर पाटील सर यांनी आपल्या मनोगतात असे सांगितले काम करणाऱ्या माणसाला कुठेही टाकले तर तो काम करत असतो.अशा वृत्तीचा सेवाभाव शिक्षकांकडे असला पाहिजे. सत्कारमूर्ती रघुनाथ बळसाने सर आपलं मनोगत व्यक्त करताना भारावून गेले होते काय बोलावं तेच कळत नव्हते शेवटी दु:ख आवरलं कसेबसे दोन शब्द बोलून ते अश्रू सावरत आपल्या जागेवर जाऊन बसले ही अशी पहिलीच घटना आहे की एका गुरुजीचा सन्मान गावातील गरीब श्रीमंत ,लहान मोठे विद्यार्थी मिळून करतात. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती वर्षा साळुंखे, बाजीराव पाडवी, कैलास पाटील,राजू वळवी, विशाल, भाऊ नाईक, रविंद्र वळवी,लखनसिंग नाईक,भाग्यवती नाईक व चिखली पुनर्वसनच्या ग्रामस्थांनी मिळून केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!