शोकसभेच्या निमित्ताने शहाद्यात सारेच संविधानाचे पाईक एकत्र

*शोकसभेच्या निमित्ताने शहाद्यात सारेच संविधानाचे पाईक एकत्र* *दि.२० ऑगस्ट रोजी शहादा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या जवळ थोर साहित्यिक, महान विचारवंत संविधानाचे गाढे अभ्यासक व ओबीसींच्या अंतरंगात ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे निसर्गवासी डॉ.हरी नरके सर व आदिवासी दलित श्रमिक कष्टकरी वंचित शोषित स्त्रियांच्या प्रश्नांना आपल्या गाण्याच्या माध्यमातून अंगावर शहारे आणणारे विद्रोही कवी निसर्गवासी “गदर” उर्फ विठ्ठल गुमाडीराव यांना आदरांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन लोकशाही जागर समितीच्या वतीने करण्यात आले होते…..या दोन्ही महान विभूतींना आदरांजली वाहण्यासाठी प्रा.विजय डोळे सर,प्रा.डाॅ.साहेबराव ईशी,प्रा.नेत्रदिपक कुवर, निवृत्त नायब तहसिलदार पेंढारकर आप्पा या मान्यवरांची उपस्थिती होती.तसेच विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते….. नंदुरबार जिल्हा परिषदेचे सदस्य काॅम्रेड मोहन शेवाळे,आरपीआयचे अरविंद कुवर, वंचित बहुजन आघाडीचे रवि मोरे,लक्ष्मण निकुंभ शिरुड, राष्ट्रवादीचे शहर प्रमुख सुरेंद्र कुवर, भारतीय बौद्ध महासभेचे धनराज ईशी,जाती अंत संघर्ष समितीचे काॅम्रेड सुनील गायकवाड ,वडाळीचे संजय खंडारे,जावदे त.ह.चे उपसरपंच बिरारे दादा,मंदाणा येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र बिरारे तसेच नंदुरबार येथून बामसेफचे राष्ट्रीय सचिव संजय मोहिते, बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे संजय निकुंभे,इब्टाचे जिल्हा संघटक रघुनाथ बळसाणे, वाकडे सर,गोटू धनगर,आदिवासी एकता परिषदेचे सुभाष भिल, फुले आंबेडकर स्टडी सर्कलचे रतिलाल सामुद्रे, नरेंद्र महिरे, संतोष कुवर, अनिल कुवर, पंचशील परिसराचे शांतीलाल अहिरे, नरेंद्र उर्फ संतोष कुवर,बागले नाना, गुरू रविदास नोकरदार मैत्री संघाचे प्रविण शिंदे,प्रशिकचे सुनील सिरसाठ,गोटू महिरे ,दिपक मोहिते, लोंढे साहेब,समता परिषदेचे राजूभाऊ माळी, नागसेन नगरचे तबरेजभाई पठाण या सह अनेक मान्यवर उपस्थित होते….. प्रास्ताविक दादाभाई पिंपळे यांनी केले तर सूत्रसंचालन नरेंद्र महिरे यांनी केले…..* *शोकसभेस संबोधतांना संजय मोहिते म्हणाले की,…..हरी नरके सर गेल्याची न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे मात्र आत्ताचा काळ कोणत्याही परिस्थितीत निराश होण्याचा नाही.ऊलट धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे गरजेचे आहे.जे याच देशात राहून संविधानाच्या विरोधात बोलतात,लिहतात, कृती करतात असे लोक खरे देशद्रोही आहेत.हीच गोष्ट कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेला पटवून सांगितली तर विषाणूंची संख्या घटण्यास मदत होईल.म्हणून संविधानाच्या बाजूने बोलणारा हाच खरा देशभक्त आहे हे लोकांच्या मनावर बिंबवले गेले पाहिजे…… लोकशाही जागर समितीच्या रंजना कान्हेरे यांनी मणिपूरचा प्रश्न लावून धरत जोपर्यंत मणिपूरमधील जनजीवन पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत कार्यकर्त्यांनी शासनात बसलेल्या लोकांना प्रश्न विचारणे बंद करु नये अशी अपेक्षा व्यक्त केली….. यावेळेस काॅम्रेड मोहन शेवाळे यांनी गदर यांच्या आठवणींना उजाळा दिला.* *शेवटी “साथियो सलाम है” हे गीत लोकशाही जागरण कार्यकर्ते चुनिलाल ब्राम्हणे,जे.विश्वास मंदाणा, सुभाष भिल, जितेंद्र बिरारे, दादाभाई पिंपळे यांनी सादर केले व शोकसभेची सांगता करण्यात आली.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!