*नेर:* *नेर येथे कानबाई मातेची मिरवणूक काढत केले उत्साहात विसर्जन:* *नेर:* धुळे तालुक्यातील नेर येथे खानदेशाची आराध्य दैवत कानबाई मातेचे मोठ्या उत्साहात जयेत तयारी केली होती.तसेच कुलस्वामिनी कानबाई मातेची उत्सवासाठी बाहेरगावी गेलेले नातलग गावी आले होते.भाविकांनी कानबाई मातेचे दर्शन घेतले.कानबाईमातेची गित म्हणण्यात आली.तर आज सकाळपासूनच सर्वत्र डीजे ढोलताश्यांच्या गजरात कानबाईमातेला डोक्यावर घेवून मिरवणूकांना सुरूवात झाली.त्यात महिलांनी फुगड्या खेळल्या.तर कानबाईमातेच्या गितांवर सर्वांनीच ठेकाही धरला होता.त्यामुळे नेर येथे सर्वत्र भक्तीमय उत्साहाचे वातावरण झाले होते. व मिरवणूक काढून निरोप दिला.तसेच नेर येथील यंदा पांझरा नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदी काठावर विसर्जनासाठी बंधू भगिनी तरुण तरुणीनी मोठ्या प्रमाणात केली गर्दी केली होती.तसेच श्रावण महिन्यात नागपंचमीच्या दिवशी कानबाई मातेची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक ही नेर गावातून म्हसदी फाटा,मेन रोड,महात्मा फुले चौक,खोल गल्ली,कोळी गल्ली,भोई गल्ली,सावित्रीबाई फुले चौक, दुर्गा माता चौक,गांधी चौक या भागातून वाजंत्री ढोल ताशांच्या डीजेच्या तालावर नेर गावातून सर्व कानबाई माताची एकत्र येऊन मिरवणूक मोठ्या थाटामाटात काढली होती तसेच मिरवणुकीमध्ये सर्व बंधू भगिनी तरुण-तरुणी नेर ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सर्व नागरीक बंधू भगिनी तरुण तरुणी ज्येष्ठ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ✍🏻 *नेर प्रतिनिधी दिलीप साळुंखे*
Related Posts
मंदिर नको, वाचनालय पाहिजे -बिरसा फायटर्स
मंदिर नको, वाचनालय पाहिजे -बिरसा फायटर्स तळोदा(प्रतिनिधी)आदिवासी सांस्कृतिक भवनात अनधिकृतपणे शिव मंदिर बांधकामाची चौकशी करून गुन्हे दाखल करावे यासाठी बिरसा…
दिपा चंद्रकांत गांगुर्डे”महाराष्ट्राची हिरकणी२०२४पुरस्काराने”सन्मानित
दिपा चंद्रकांत गांगुर्डे”महाराष्ट्राची हिरकणी२०२४पुरस्काराने”सन्मानित ————————————————————कल्याण(गुरुनाथ तिरपणकर)-८मार्च हा जागतिक महिला दिन,याच महिला दिनाचे औचित्य साधून मुंबई येथील सुनिर्मल फाऊंडेशनने महाराष्ट्रातील विविध…
दोंडाईचेत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मा. अप्पर तहसीलदार यांना निवेदन
*दोंडाईचेत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मा. अप्पर तहसीलदार यांना निवेदन* ( प्रतिनिधी गोपाल कोळी ) दोंडाईंचा ता. जालना जिल्ह्यात मराठा…