गधडदेव येथील जि.प.शाळेत रोहिदास पाडवी यांच्या कडुन शैक्षणिक साहित्य व बिस्किट वाटप

गधडदेव येथील जि.प.शाळेत रोहिदास पाडवी यांच्या कडुन शैक्षणिक साहित्य व बिस्किट वाटप
प्रतीनिधी गोपाल कोळी
शिरपुर तालुक्यातील गधडदेव येथील जि.प. शाळेत १लीते ४थी चे विध्यार्थ्यांना बिरसा ब्रिग्रेडचे धुळे जिल्हा सहकार्य अध्यक्ष यांच्या कडुन शैक्षणिक साहित्य व बिस्किट वाटप करण्यात आले..गधडदेव येथील जि.शाळेतील गरीब वंचित आदिवासी समुदायातील विध्यार्थी शैक्षणिक पासुन वंचित राहु नये व विध्यार्थांचे शिक्षण सुरळीत चालु असावे आणी पटसंख्या टिकुन राहावी या उद्देशाने गधडदेव येथील बिरसा ब्रिग्रेडचे धुळे जिल्हा सहकार्य अध्यक्ष रोहिदास पाडवी जि.प.शाळेतील गरीब व गरजु विध्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य व बिस्किट वाटप करण्यात आले यावेळी रोहिदास पाडवी, सरपंच आत्माराम अहिरे, ताराचंद ठाकरे, मुख्याध्यापक जगदिश डुडवे, उपशिक्षक मनोज पावरा, रोशन सोमवशी, मनोज बहिरम पोलीस पाटील सतरसिंग पाडवी व ग्रामस्थ उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!