*स्वो. वि. संस्थेच्या *दादासाहेब रावल माध्य व उच्च माध्य विद्यालय मालपूर येथे दोन प्रोजेक्टवरती दाखविण्यांत आले*
प्रतिनिधी गोपाल कोळी
मालपुर ता. दि.२३/०८/२०२३ रोजी सायंकाळी ५ वा. मुख्याध्यापक श्री ए एन पाटील सर यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व विद्यार्थ्यांना चांद्रयान ३ (विक्रम लॕन्डर)चे दक्षिण ध्रुवावरचे प्रत्यक्ष (Live)साॕफ्ट लॕन्डीग दोन प्रोजेक्टरती दाखविण्यात आले.
तसेच उत्कर्ष छात्रालय मालपूर याठिकाणी देखील एका प्रोजेक्टरवरती विद्यार्थ्यांना चांद्रयान ३ चे साॕफ्ट लॕन्डींग दाखविण्यात आले.भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यात भारतीय इस्रोच्या शास्त्रज्ञांना यश आलेले पाहुन पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ध्वज हातात धरून अभिनंदन केले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री ए एन पाटील सर, पर्यवेक्षिका सौ भावे मॕडम ग्रंथपाल श्री प्रमोदजी भाऊसाहेब ,विज्ञान शिक्षक श्री एस पी भावसार, श्री निलेश देवरे ,श्री डी ए पाटील श्री आर एस लिंगायत सर , तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधु-भगिनींचे सहकार्य लाभले .
कार्यक्रमास स्वो. वि. संस्थेचे अध्यक्ष सरकार साहेब रावल संस्थेचे सचिव माननीय जयकुमार भाऊ रावल तसेच संस्थेचे खजिनदार मा.सी.एन. भाऊसाहेब तसेच संस्थेचे सामान्य प्रशासन सचिव मा. ललितसिंह भाऊसाहेब यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेतर बंधू भगिनीचे सहकार्य लाभले.