. डॉ.भास्कर सदाशिव देसले विज्ञान महाविद्यालय कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन:

*नेर:* *डॉ.भास्कर सदाशिव देसले विज्ञान महाविद्यालय कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन:* *नेर:* साक्री येथील त्रिमूर्ती शिक्षण संस्थेचे श्रीमती विमलबाई उत्तमराव पाटील कला व कै. डॉ.भास्कर सदाशिव देसले विज्ञान महाविद्यालय साक्री येथे कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना बहिणाबाई चौधरी यांच्या जीवन विषयक परिचय व्हावा या दृष्टीने कार्यक्रम घेण्यात आला. बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन सर्व प्राध्यापक वृंद यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. वसुमती पाटील यांनी विद्यार्थ्यांना बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या कवितेतून मानवाला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन दिला याविषयी कवितांची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अंधश्रद्धेला बळी जाता कामा नये ही स्थिती पाहता बहिणाबाईंची कविता आपणास मार्गदर्शक ठरते असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सुचित केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.कैलास वाघ यांनी केले आभार प्रदर्शन डॉ.प्रा.डॉ.निलेश माळीचकर यांनी केले कार्यक्रम प्रसंगी डॉ. ममता पंजाबी,प्रा.डॉ. गुलाबसिंग पावरा,डॉ.शरद सोनवणे प्रा.अशोक भदाणे उपस्थित होते.कार्यक्रमासाठी प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!