मौजे बिलाडी त सा सजा अंतर्गत बामखेडा त सा येथे राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढ व मुल्यसाखळी विकास योजना अंतर्गत सोयाबीन पिकाची शेतीशाळा
महिला शेतीशाळा शेतकऱ्यांची शेतीशाळा घेण्यात आली असून सदर शेतीशाळेस मार्गदर्शक म्हणुन शहादा उपविभागाचे
उपविभागीय कृषी अधिकारी श्री तानाजी खर्डे सो यांनी महिला शेतीशाळेस मार्गदर्शन केले, श्री तानाजी खर्डे यांनी सोयाबीन पिकांची उत्पादकता वाढी साठीच्या उपाययोजना व सोयाबीन पिकाच्या पिकासाठी उत्पादन खर्च कमी करणे, रासायनिक कीडनाशकांचा वापर कमी करून खर्चात बचत करणे व निसर्गाच्या समतोल राखण्यासाठी निमार्क चा वापर व जैविक कीडनाशकांचा वापर करणे बाबत मार्गदर्शन केले तसेच महिलांना सक्षम व स्वावलंबी होण्यासाठी अन्नप्रक्रिया चे लघु उद्योग उभारण्यासाठी पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन केले, श्री सुरेश बागुल ,मंडळ कृषी अधिकारी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत ज्या लाभार्थ्यांना निधीचा लाभ मिळण्यास विलंब होत आहे किंवा खात्यात लाभाचा हप्ता येत नाही त्यांनी आधार संलग्न बँक खाते करून घ्यावे किंवा पोस्टात खाते उघडुन घेण्याबाबत माहिती दिली,तसेच पर्यवेक्षक कृषि सहायक कु स्वाती गावित यांनी सोयाबीन पिकावरील शत्रु कीड व मित्र कीड यांची हुबेहुब प्रतिकृती तयार करून त्या प्रतिकृती द्वारे मित्रकिड व शत्रुकिड यांची ओळख करून दिली , सदर कार्यक्रमास सौ साधनबेन पाटील, सौ प्रभावती पाटील, सौ लक्ष्मी बेन पाटील व इतर महिला शेतकरी उपस्थित होत्या,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जितेंद्र भोई कृषी सहाय्यक यांनी केले व सदर शेतीशाळे चे नियोजन कु स्वाती गावीत यांनी केले