लढा प्राथमिक शिक्षक संघटनेची शहादा येथे सहविचार सभा

*लढा प्राथमिक शिक्षक संघटनेची शहादा येथे सहविचार सभा*आज दि. 26 ऑगस्ट 2023 रोजी लढा प्राथमिक शिक्षक संघटना शाखा शहादा यांची मासिक सहविचार सभा पार पडली. या सभेत शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. वस्तीशाळा शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू करुन थकीत फरक बील लवकरात लवकर मिळावे. जीपीएफ फंडाचा हिशोब मिळावा. एनपीएस खाते त्रुटींची पुर्तता करणे. दरमहा एक तारखेला शिक्षकांचे वेतन अदा व्हावे. अशा शिक्षकांच्या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करुन मा.गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती शहादा यांना निवेदन देण्याचे सर्वानुमते ठरले. यावेळी संघटनेचे विभागीय जिल्हाध्यक्ष हिरालाल मुसळदे, सहकार्याध्यक्ष दिलीप भिल, तालुकाध्यक्ष रविंद्र पावरा, उपाध्यक्ष राजकुमार पावरा, जगन पावरा, मुनिम पावरा, संतोष रावताळे, धरमसिंग पावरा, शामलाल पावरा, दामोदर पावरा, कुसाल पावरा, अनिल मोरे, संतोष पवार असे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!