*सुदर्शन पार्क,लोणखेडा येथे वृक्षारोपण संपन्न*
प्रतिनिधी – संजय गुरव
लोणखेडा,ता.शहादा येथील दि.27 ऑगस्ट रोजी गावाचे सरपंच संजय पाटील यांचा हस्ते “वृक्षारोपण” कार्यक्रम संपन्न झाला.सदर विस्तार परिसर हा सुंदर असुन या विस्तारात फक्त वृक्षांचा अभाव होता.तसेच काही वृक्षी बुरशी लागल्याने खाली पडले होते.सदर विस्तारातील रहिवासींनी या विस्ताराला सुंदर व सुशोभित करण्याचे ठरवले. दि.27 रोजी सर्व सोसायटीतील रहिवासी रविन्द्र भावसार,संदीप पाटील,किरण पाटील,संजय गुरव,प्रदिप गिरासे,गणेश पाटील,संतोष चित्ते,प्रशांत लोहार,शरद पाटील, लोहार दादा,प्रमोद लोहार,दिपक चौधरी उपस्थित होते.सदर कार्यक्रमात अनेक मान्यवर लोणखेडा गावाचे सरपंच संजय पाटील, मानव विकास पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष बंटी भाउ नेतलेकर,मानव विकास पत्रकार संघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष व झुंजार क्रांती वृत्तपत्राचे संपादक कृष्णा कोळी,मानव विकास पत्रकार संघाचे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष नरेश शिंदे, उपस्थित होते