*कॉग्रेसची दि. 3ते 12 सप्टेंबर जनसंवाद पदयात्रासहभागी होण्याचे आ.कुणाल पाटील यांचे आवाहन काँग्रेस बैठकीत दुष्काळाबाबत ठराव*प्रतिनिधी गोपाल कोळीधुळे- देशाचे नेते खा.राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालेल्या भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर धुळे जिल्हयात दि.3 ते 12 सप्टेंबर दरम्यान काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे. सदर पदयात्रेत जिल्हयातील नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील केले.पदयात्रेत सहभागी होण्यासाठी काँग्रेस भवनात नाव नोंदणी करण्याचे आवाहन काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी केले आहे. दरम्यान या पदयात्रेत काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील, सौ.अश्विनीताई कुणाल पाटील आणि जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर हे पूर्णवेळ सहभागी होणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष सनेर यांनी सांगितले.दरम्यान *धुळे जिल्हा दुष्काळी जाहिर करावा असाही ठराव एकमताने काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आला.*याबाबत सविस्तर वृत्त असे कि, देशात आणि राज्यात सरकारच्या दडपशाहीमुळे भितीचे वातावरण पसरले आहे. वाढती महागाई, महिलांवर होणारे अत्याचार, शेतीमालाला भाव नाही, जातीय-धार्मिक तेढ निर्माण करणे, तसेच विरोधकांचा आवाज दाबून लोकशाही संविधान संपविण्याचे कट कारस्थान यामुळे जनतेच्या मनात प्रचंड चिड निर्माण झाली आहे. त्यामुळे जनभावना जाणून घेतांना जनतेच्या मनातील भिती दूर व्हावी म्हणून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे व देशाचे नेते खा.राहूल गांध यांच्या यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हयात काँग्रेसकडून जनसंवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे. धुळे जिल्हयात जनसंवाद पदयात्रा विधीमंडळ नेते आ.बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आणि कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. त्याअनुंषगाने आज दि.26 ऑगस्ट रोजी काँग्रेस भवनात सायं.4 वा.बैठक झाली. यावेळी धुळे जिल्हयातील जनसंवाद पदयात्रेबाबत नियोजनावर चर्चा झाली. त्यात दि. 3 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 2023 दरम्यान ही जनसंवाद पदयात्रा धुळे जिल्ह्यातील विविध गावातून मार्गक्रमण करणार आहे. त्यात सकाळी 6 वा.पदयात्रेला प्रार्थनेने सुरुवात होणार आहे. सकाळी 6.30 वा. ते 9.30 दरम्यान पदयात्रेत पायी चालणे पहिला टप्पा, स.9.30ते दु.12 वा विश्रांती व कार्यकर्त्यांशी चर्चा, दु.12 वा. ते 2 वा. जाहिर सभा, दु.2 ते 3 विश्रांती, 4 वा.पर्यंत भेटीगाठी, सायं.4 ते 7 वा.पदयात्रा दुसरा टप्पा, सायं.7.30 वा.जाहिर सभा आणि रात्री मुक्काम अशाप्रकारे पदयात्रेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. या पदयात्रेत तालुकायात्री व जिल्हायात्रींची नोंदणी करुन नेमणूक करण्यात येणार आहे. हे पदयात्री सलग दहा दिवस पदयात्री सहभागी असतील. सदर जनसंवाद पदयात्रेत प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील,सौ.अश्विनीताई कुणाल पाटील,जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांच्यासह काँग्रेस आजी माजी आमदार,माजी खासदार, सर्व पदाधिकारी सहभागी होणार आहेत. सर्वसामान्य जनता आणि शेतकर्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी निघणार्या जनसंवाद यात्रेत जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन आ.कुणाल पाटील यांनी केले. यावेळी काँग्रेस कार्याध्यक्ष शाम सनेर, शहराध्यक्ष डॉ.अनिल भामरे पदयात्रेची माहिती दिली.*दुष्काळाचा ठराव-काँग्रेस भवनात झालेल्या बैठकीत आ.कुणाल पाटील यांनी सूचविल्यानुसार जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी धुळे जिल्हा दुष्काळी जाहिर करावा आणि सरकारने तातडीने मदत जाहिर करावी असा ठराव मांडला. उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमताने हात उंचावून ठराव मंजुर केला.काँग्रेस भवनात झालेल्या बैठकीला काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील, माजी खा.बापू चौरे,जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर,सौ.अश्विनीताई पाटील,प्रदेश सचिव युवराज करनकाळ, धुळे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल भामरे,माजी आ.डी.एस.अहिरे, माजी आमदार वसंतराव सूर्यवंशी युसुफ सय्यद दिनेश देसले प्रज्योत देसले राहुल माणिक वीरेंद्र झालसे इम्तियाज पठाण प्रमोद सिसोदे नगरसेवक साबीर खान,ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, ज्येष्ठ नेते गुलाबराव कोतेकर, महिला काँग्रेस अध्यक्षा गायत्री जयस्वाल,रणजित पावरा, उत्तमराव देसले,भानुदास गांगुर्डे साक्री,पंढरीनाथ पाटील,कृऊबा व्हा.चेअरमन योगेश पाटील,संचालक एन.डी.पाटील, शकील अहमद, मुझफ्फर हुसैन, प्रमोद सिसोदे, दिपक साळुंके, माजी संचालक प्रकाश पाटील,अशोक सुडके,डॉ. दत्ता परदेशी,युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे,मधुकर पाटील,रावसाहेब पाटील,राजीव पाटील,छोटूभाऊ चौधरी,डॉ.संदिप पाटील,भानुदास माळी, ज्येष्ठ नेते भिका पाटील, सोमनाथ पाटील,शिंदखेडा पं.स.सदस्य राजेंद्र देवरे,सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अलोक रघुवंशी, प्रा.मुकेश पाटील, राजेंद्र खैरनारएकनाथ वाघ दीपक अहिरे अशोक सोनवणे महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सौ.संध्याताई चौधरी,सौ.अर्चना पाटील,शहराध्यक्षा बानुबाई शिरसाठ,छायाबाई पाटील,अलकाबाई बिर्हाडे,यामिनी पाटील, भटू महाले यांच्यासह शिरपुर,शिदखेडा,साक्री,धुळे तालुका शहरातील काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Related Posts
शिक्षण हक्क परिषदांचे ठराव जिल्हाधिका-यांना देण्यात आले,शाळा वाचवण्यासाठी शिवराज्य प्रतिष्ठानने घेतला पुढाकार…!
*शिक्षण हक्क परिषदांचे ठराव जिल्हाधिका-यांना देण्यात आले,शाळा वाचवण्यासाठी शिवराज्य प्रतिष्ठानने घेतला पुढाकार…!* ठाणे (प्रतिनिधी-प्रियंका गावंडे)शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित शाळा…
मनवेल येथे भुरट्या चोरांचा धुमाकूळ
मनवेल थेथे भुरट्या चोरांच्या धुमाकूळमनवेल ता.यावल : येथील जि.प.शाळेतील भंगार खोलीत भुरट्या चोरांच्या धुमाकुळ सुरु असल्याचे शाळेतील शिक्षकांचा निर्दशनात आले…
मतीमंद मुलींची निवासी शाळा येथे वाढदिवस साजरा
ðð¼ मतीमंद मुलींची निवासी शाळा येथे वाढदिवस साजरा ðð¼नंदुरबार : — गुरुकुलनगर येथील मतीमंद मुलींची निवासी शाळा ही गेली पंधरा…