बिबट्याचा पुन्हा मानवावर हल्ला,*
प्रतिनिधी – संजय गुरव*
तळोदा तालुक्यातील दलेलेपूर शिवारात पुन्हा एकदा बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला करून त्याला जखमी केले. त्या व्यक्तीच्या म्हशींनी बिबट्यावर उलट हल्ला करून त्याला पळवून लावल्याने वृद्धाचे प्राण वाचू शकले आहे.म्हशींचे रौद्ररूप पाहून बिबट्याने त्या ठिकाणाहून पलायन केले.याबाबत सविस्तर माहिती अशी की, बादशहा अर्जून भरवाड (वय ६५) हे गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास दलेलपूर शिवारात आपली गुरे चारत होते. त्यावेळी अचानक शेजारील केळीच्या शेतातून बिबट्याने येऊन त्यांच्यावर हल्ला चढवला. बिबट्या बघून चरत असणाऱ्या गुरांमध्ये देखील मोठे भीती निर्माण झाली.काही गुरेपळून जात असताना ते चारत असलेल्या त्यांच्या काही म्हशी त्यांच्या संरक्षणासाठी पुढे आल्या.या म्हशींनी बिबट्यावर उलट चालून जात बिबट्याचा हल्ला परतून लावला. एकत्रित चार-पाच म्हशींचे रौद्ररूप पाहून बिबट्यांनी त्या ठिकाणाहून धूम ठोकली.आता संबंधीत अधिकारींनी लपून बसलेल्या या नर भक्षक बिबट्याचा शोध सुरू केला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्ध बादशाह भरवाड यांना उपचारासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने घटनास्थळी धाव घेतली व पुढील सोपस्कार पार पाडले. बिबट्या रोकडमल मंदिरा लगत असणाऱ्या केळीच्या शेतात लपून असल्याची माहिती जवळपासच्या लोकांनी वनविभागाला दिली. दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध पशुपालक बादशहा भरवाड हे किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.