डॉ. निकिता मराठे एम एस प्राविण्याने उत्तीर्ण मराठे कुटुंबाची वैद्यकीय क्षेत्रात भरारीमुक्ताईनगर : येथील डॉ. निकिता नारायणराव मराठे यांनी वैद्यकशास्त्रात पदव्युत्तर अभ्यासक्रमात एम. एस.(जनरल सर्जन) या अभ्यास क्रमात विशेष प्रविण्याने उत्तीर्ण होण्याचे यश प्रदान केले आहे. रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे महात्मा गांधी मिशन कॅम्पस येथे पार पडलेल्या पदवीदान समारंभात त्यांना एमएस जनरल सर्जन या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. प्रसंगी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, कुलपती कामलकिशोर कदम उपस्थित होते. डॉ. निकिता मराठे या मुक्ताईनगर येथील ह्रदयरोग तज्ञ डॉ.एन. जी.मराठे यांच्या कन्या आहेत. तर वैद्यकीय अधिकारी डॉ. गायत्री मराठे (एमबीबीएस) यांच्या भगिनी आहेत. मराठे कुटुंबाचे तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदनआहे.त्यांच्या मुलगा यश मराठे एम बी बी एस करीत आहे. जवाई राहुल जाधव (एमबीबीएस)वैद्यकीय अधिकारी तर आहेत. कुटुंबातील वैद्यकीय भरारीत डॉ. एन जी मराठे व त्यांच्या पत्नी सुनंदा मराठे यांचे मोठे योगदान आहे.
डॉ. निकिता मराठे एम एस प्राविण्याने उत्तीर्ण मराठे कुटुंबाची वैद्यकीय क्षेत्रात भरारी
