*ललित वारुडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याची जनभावना*( प्रतिनिधी गोपाल कोळी )दोंडाईचा ता. बेटावद जिल्हा परिषद गटाचे विद्यमान सदस्य ललित मधुकर वारुडे यांची आज दि २९ ऑगस्ट रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांचे विचार सर्वदूर पोहचवण्यासाठी प्रयत्नशील राहाल या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांनी नियुक्ती पत्र दिले. ललित वारुडे यांनी ग्रामपंचायत सरपंच शिंदखेडा पंचायत समितीचे उपसभापती,वर्षी जिल्हा परिषद गट आणि बेटावद जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधी त्व केले आहे. शिंदखेडा तालुका अध्यक्ष म्हणून १०,तर ५ वर्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष असे पंधरा वर्षे संघटना बळकट करण्यासाठी कार्य केले आहे.राज्याचे माजी विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे, धुळे जिल्हा निरीक्षक उमेश पाटील, रोहिणी ताई खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी धुळे जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष उषाताई पाटील, धुळे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले आदींनी त्यांच्या निवडीचे कौतुक केले आहे. ललित वारुडे यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने खरोखरच न्याय दिल्याची जनभावना आहे.
ललित वारुडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याची जनभावना
