*महाराष्ट्र शासनाचा जिल्हा परिषद नंदुरबार मार्फत ग्रामपंचायत भुलाणे ता. तळोदा जि. नंदुरबार येथे सन २०२१ २०२२ २ या वर्षात ग्राम पातळीवर ग्रामविकासाच्या केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल श्री. मुकेश रमेश सावंत (ग्रामसेवक ) दि.०५/०८/२०२३ रोजी आदर्श ग्रामसेवक म्हणून प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देवुन गौरविण्यात आले* प्रतिनीधी गोपाल कोळी मालपुर ता.शिंदखेडा येथील प्रगतीशील शेतकरी श्री. रमेश दिंगबर सावंत यांचे मोठे चिरंजीव ग्रामसेवक मुकेश रमेश सावंत यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सहपरिवार सहित सन्मानित करण्यात आले ग्रामविकासाची संकल्पना आपल्या असाधारण इच्छाशक्ती व कर्तृत्वातून साकारणाऱ्या ग्रामसेवकांना आदर्श पुरस्काराने गौरवण्यात येते, त्याचप्रमाणे राज्यातील पेसा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसेवकांना आदिवासी विकास विभागामार्फत पुरस्कार देण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केली आहे. ते नंदुरबार जिल्हा परिषदेत आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे वितरण सोहळ्यात बोलत होते.यावेळी जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हीना गावित, सभापती संगीता गावित, गणेश पराडके, हेमलता शितोळे,सभापती जि.प. नंदुरबार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, जयंत उगले, प्रकल्प संचालक एम.डी. धस, ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाचा जिल्हा परिषद नंदुरबार मार्फत ग्रामपंचायत भुलाणे ता. तळोदा जि. नंदुरबार येथे सन २०२१ २०२२ २ या वर्षात ग्राम पातळीवर ग्रामविकासाच्या केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल श्री. मुकेश रमेश सावंत (ग्रामसेवक ) दि.०५/०८/२०२३ रोजी आदर्श ग्रामसेवक म्हणून प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देवुन गौरविण्यात आले*
