कायद्याचे मूळ स्वरूप समजणे आवश्यक – श्री अविनाश मोकाशी
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित नसरापूर शंकरराव भेलके महाविद्यालयामध्ये रॅगिंग विरोधी सप्ताहाचे आयोजन महाविद्यालयातील अँटी रॅगिंग समितीने केले होते. या संपूर्ण सप्ताहामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली रॅगिंग सारख्या गंभीर विषयावर विद्यार्थ्यांना वैचारिकरित्या जागरूक करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अविनाश मोकाशी ( निवृत्त सनदी अधिकारी व सौ. प्रिया मोकाशी उपस्थित होत्या. श्री. अविनाश मोकाशी सर यांनी रॅगिंग विरोधी कायदे व नियम याबाबत मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायदा 1999, विनयभंग, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, या कायद्याअंतर्गत कारवाई, शिक्षा, दंड इत्यादी विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. या वेळी कॉलेजच्या आवारात अँटी रॅगिंग सादरीकरण भित्तिपत्रके, अँटी रॅगिंग विषयी तक्रार निवारण टोल फ्री नंबर, रॅगिंग विषयी कायदे नियम यांची भित्तिपत्रके, पोस्टर प्रेझेंटेशन, निबंध लेखन या विविध उपक्रमांचे नियोजन केले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.हिमालया सकट तर प्रास्ताविक डॉ जगदीश शेवते यांनी केले. कार्यक्रम नियोजनबद्ध करण्यासाठी प्रा. जाधवर दयानंद व प्रा. महेश कोळपे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा. सहदेव रोडे, प्रा. पौर्णिमा कारळे, प्रा. भगवान गावित, प्रा. माऊली कोंडे, प्रा पोमन कोमल, प्रा. कापरे प्राजक्ता, प्रा. ऋतुजा साळुंखे उपस्थित होते.