*जिल्हा काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा सोमवारी क्रांतीस्मारक येथून शुभारंभ*
( प्रतिनीधी गोपाल कोळी )
साळवे ता. शिंदखेडा देशातील जनतेला भरमसाठ खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेले केंद्रातील भाजपा सरकार, बेईमानीने फोडाफोडीच्या राजकारणातून निर्माण झालेले महाराष्ट्रातील राज्य सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णतः अपयशी ठरले आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी व कामगार विरोधी धोरणे, सार्वजनिक संस्थांचे खाजगीकरण, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, देशाची लोकशाही व संविधान संपविण्याचे कट-कारस्थान यामुळे जनतेच्या मनात प्रचंड संताप आहे. महिलांवरील अत्याचार व वारंवार घडत असलेल्या जातीय-धार्मिक दंगलीमुळे सर्वसामान्य जनता भयभयीत झालेली असून त्यांच्या मनात राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड चीड तयार झालेली आहे. असंतोष मनात खदखदत आहे. या पार्श्वभूमीवर लोकभावना जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यात पदयात्रा काढण्याबाबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय ना. श्री मल्लिकार्जुन खरगे साहेब यांच्या आदेशानुसार व खा. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आ. श्री नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेनुसार राज्यात 3 ते 12 सप्टेंबर दरम्यान ‘जनसंवाद पदयात्रा’ प्रत्येक जिल्ह्यातून काढण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील जनसंवाद पदयात्रेचा जिल्ह्याचे नेते, प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल बाबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. ४ सप्टेंबर २०२३ रोजी क्रांतीस्मारक, साळवे-चिमठाणे येथे सकाळी ६ वाजता अभिवादन करुन शुभारंभ होणार आहे. ही पदयात्रा सिंदखेडा तालुक्यातील साळवे, हतनूर, भडणे, परसामळ या मार्गाने सिंदखेडा शहरात पदयात्रा जाणार आहे. दुसऱ्या सत्रात दुपारी ४ वाजता चिरणे, कदाने, बाभूळदे, महाळपूर, निशाणे मार्गे *खलाणे येथे जाहीर सभा* संध्याकाळी ७.०० वा जनसंवाद पदयात्रा खलाणे येथे पोहचणार असूनप्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल बाबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा होणार आहे.या पदयात्रेत तालुका काँग्रेस अध्यक्ष, तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष, जिल्ह्यातील महिला काँग्रेस, इंटक, सेवादल, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती सेल अध्यक्ष, तालुक्यातील सर्व आघाडी, सेल अध्यक्ष, आजी-माजी आमदार, खासदार, जि प सदस्य, प. स. सदस्य आणि काँग्रेसचे ज्येष्ठ- श्रेष्ठ पदाधिकारी यांनी या जनसंवाद यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री शामकांत सनेर यांनी केले आहे.