*खंडलाय बु. येथील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जागेची मोजणी अखेर पूर्ण:* *नेर:* धुळे तालुक्यातील खंडलाय बु. येथील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जागेची मोजणी अखेर पूर्ण करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत खंडालाय बु. गावातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे दिवसा ८ तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी खंडलाय बु. चे ग्रामपंचायत गटप्रमुख आबा पगारे कायम कटिबध्द असुन, सरपंच,उपसरपंच, सदस्य, त्याचप्रमाणे आपल्या धुळे ग्रामीणचे पाणीदार आमदार आदरणीय बाबासो. कुणालजी पाटील* यांच्या विशेष प्रयत्नाने अखेर जमीन मोजणीचा तिढा कायमचा सुटला, आणि मोजणी झालीच. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत खंडलाय गावात सौरऊर्जा प्रकल्पाचे काम होणार आहे तरी त्यासाठी जागा मोजणीचे काम रखडले होते याविषयी मोठ्या प्रमाणावर पाठवा पुरावा करून रखडलेली निविदा प्रक्रिया सुरू करण्यात यश मिळाले. फेब्रुवारी २०२३ पासून सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यास मंजुरी देण्यात आली होती. प्रकल्प उभारण्यास जागेची आवश्यकता होती, पण जागा मोजण्याचे काम काही महिन्यापासून प्रलंबित होती, मात्र सततचा पाठपुरावामुळे ग्रामपंचायत गटप्रमुख आबा पगारे व त्यांचं कार्यकारी मंडळ यांना मोठं यश मिळाले. म्हणुन भूमी अभिलेख विभागाने तातडीने जागेची मोजणी केली. यावेळी महावितरण कंपनीचे स्थापत्य विभागाचे उपकार्यकारी अभियंता (स्थापत्य) सुदर्शन म्हस्केसाहेब, मिलिंद दाभाडेसाहेब,एस के पावरा,भूमी अभिलेख विभागाचे ललेष पाटीलसाहेब,त्याचप्रमाणे खंडलाय बुद्रुक ग्रामपंचायत गटप्रमुख आबा पगारे,सरपंच,उपसरपंच,सदस्य,कोतवाल सुनिल देवरे,सामाजिक कार्यकर्ते आनंदा पाटील, यशवंतनाना बागुल, पंकज रोकडे, आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
खंडलाय बु. येथील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जागेची मोजणी अखेर पूर्ण
