*दोंडाईचेत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मा. अप्पर तहसीलदार यांना निवेदन* ( प्रतिनिधी गोपाल कोळी ) दोंडाईंचा ता. जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेला लाठीचार्ज हा सरकार पुरस्कृत भ्याड हल्ला आहे. त्याचा निषेधार्थ दोंडाईचा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मा. तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक आंदोलने सातत्याने करत आहे.लोकशाहीने त्यांना दिलेला तो हक्क आहे.पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडणे योग्य नाही. चर्चेच्या माध्यमातून अनेक आंदोलनामध्ये मार्ग निघालेला आहे हा आजवरचा इतिहास आहे.मराठा आरक्षणावर केंद्र व राज्य सरकारने तातडीने योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे. केंद्रात बहुमताचे सरकार म्हणजे महाशक्तीचे सरकार असून जर मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत नसेल तर हे केंद्र आणि राज्य सरकारचे अपयश आहे. तरी जालना जिल्ह्यातील घटनेचा निषेध म्हणून मराठा क्रांती मोर्चाने वतीने या.अप्पर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी दोंडाईचा मा. नगराध्यक्ष बापुसाहेब रविंद्र देशमुख वसंत कोळी राहुल माणिक छोटु मराठे मा. नगरसेवक मराठा क्रांती मोर्चाचे विजु बापु पाटील, मयुर सोनवणे , राज सोनवणे , हेमंत पाटील, ईश्वर पाटील, राज खोंडे , गणेश कोळी, विशाल पाटील, विकास पाटील उपस्थित होते.
Related Posts
गधडदेव येथील जि.प.शाळेत रोहिदास पाडवी यांच्या कडुन शैक्षणिक साहित्य व बिस्किट वाटप
गधडदेव येथील जि.प.शाळेत रोहिदास पाडवी यांच्या कडुन शैक्षणिक साहित्य व बिस्किट वाटपप्रतीनिधी गोपाल कोळीशिरपुर तालुक्यातील गधडदेव येथील जि.प. शाळेत १लीते…
सन मराठी च्या वेतोबा मालिकेत चमकल्या कणकवली च्या अक्षता कांबळी गाव मामी ठरतेय प्रेक्षकांसाठी लक्षवेधी
सन मराठी च्या वेतोबा मालिकेत चमकल्या कणकवली च्या अक्षता कांबळी गाव मामी ठरतेय प्रेक्षकांसाठी लक्षवेधी कणकवली (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)नुकत्याच सुरू झालेल्या…
महाराष्ट्र मधील सर्व आयोगात रिक्त जागा भरण्यात यावे मुख्यमंत्री साहेबांना माहिती अधिकार महासंघाची मागणी
महाराष्ट्र मधील सर्व आयोगात रिक्त जागा भरण्यात यावे मुख्यमंत्री साहेबांना माहिती अधिकार महासंघाची मागणी महाराष्ट्र शासनाचे विविध आयोगामध्ये रिक्त जागा…