*स्वो. वि. संस्थेच्या दादासाहेब रावल माध्य व उच्च माध्य विद्यालय मालपूर येथे संस्कृत दिन उत्साहात साजरा* भारतस्य प्रतिष्ठे वन्दे संस्कृतम् संस्कृती: तथा|( मालपुर प्रतिनिधी गोपाल कोळी) मालपुर ता.शिंदखेडा येथे नारळी पौर्णिमा हा दिवस जसा रक्षाबंधन म्हणून साजरा करण्यात येतो तसाच हा दिवस संपूर्ण भारतात संस्कृत दिन म्हणून सूध्दा साजरा करण्यात येतो. आज आपल्या शाळेत विद्यार्थ्यांनी संस्कृत दिनाच्या निमित्ताने संस्कृत भाषेतून विविध सुभाषिते, काव्य,गीते तसेच मनोगत सादर केले. सदर कार्यक्रमास प्राचार्य बापूसो श्री. ए. एन. पाटील सर व शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.भाग्यश्री भावे मॕडम ग्रंथपाल श्री प्रमोदजी भाऊसाहेब सर्व , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास स्वो. वि. संस्थेचे अध्यक्ष विकासरत्न आदरणीय सरकार साहेबजी रावल संस्थेचे सचिव माननीय जयकुमारजी भाऊ रावल तसेच संस्थेचे खजिनदार मा.सी.एन. भाऊसाहेब तसेच संस्थेचे सामान्य प्रशासन सचिव मा. ललितसिंह भाऊसाहेब यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात श्री.शेख सर, श्री.नगरदेवळेकर सर, श्री.चव्हाण सर, यांनी मनोगत व्यक्त करून संस्कृत भाषेचे महत्त्व विषद केले. यावेळी सर्व शिक्षक बंधु भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
स्वो. वि. संस्थेच्या दादासाहेब रावल माध्य व उच्च माध्य विद्यालय मालपूर येथे संस्कृत दिन उत्साहात साजरा
