रोहित दादा पवार आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांच्या कडे देगाव येथील शेतकरी चि. राहुल कोळी यांनी निवेदन देऊन समस्यां सोडविण्याची मागणी करण्यात आली

*रोहित दादा पवार आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांच्या कडे देगाव येथील शेतकरी चि. राहुल कोळी यांनी निवेदन देऊन समस्यां सोडविण्याची मागणी करण्यात आली* ( प्रतिनीधी गोपाल कोळी ) शिंदखेडा ता. मौजे देगाव येथील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विजेच्या समस्यांसाठी तोडगा निघणे बाबत आदरणीय साहेब आम्ही शिंदखेडा मतदारसंघातील मौजे देगाव परिसरातील शेतकरी शेतीसाठी मिळणाऱ्या विजेच्या समस्या पोटी हैराण झालेलो आहोत. जेवढी वीज आम्हाला मिळते त्यातही दोन-तीन तास लाईट बंद ठेवण्याचा प्रकार या परिसरात वारंवार होत आहे. पहिलेच संबंध महाराष्ट्र आणि विशेष करून आमचा तालुका कायमस्वरूपी दुष्काळी तालुका असल्याने यंदा पावसाअभावी भयानक परिस्थितीला सामोरे जाण्याचे संकेत आहेत. ज्यांच्याकडे थोडेफार प्रमाणात असलेले पाणी पिकांना देण्यासाठी जे शेतकरी धडपडत आहेत त्यांना नियोजित वेळेप्रमाणे विज उपलब्ध होत नाही. अशा वारंवार तक्रार करून सुद्धा याच्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. निसर्गाने तर शेतकऱ्यांना मारलेच परंतु सरकारनेही शेतकऱ्यांना दफन करण्याचा विडा उचललेला आहे असं जाणवत आहे. आपण या राज्याचे युवा नेतृत्व आहात या नजरेने आम्ही आपल्याकडे पाहतो. आमचा विषय कुठेतरी शासन दरबारी मांडावा अशी आमची प्रखर इच्छा आहे व आपणास पुढील काळासाठी भरभरून शुभेच्छा. अशी मागणी निवेदना द्वारे करण्यात आली. मागणीकर्ता राहुल कोळी , गोकुळ कोळी, योगेश पाटील, रावसाहेब पाटील ,भूषण कोळी , राहुल पवार, सोनू महिरे रविंद्र कोळी, विनोद चांभार, लक्ष्मण पाटील, आदि सह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!