नेर: नेरचे भूमिपुत्र डॉ.आर.टी.बोरसे यांनी क्षयरोग( टी.बी.)आजारावर संशोधन केल्यामुळे नेर ग्रामस्थांतर्फे सत्कार:
नेर: धुळे तालुक्यातील नेर येथील तसेच पुणे येथील ससून रुग्णालयाचे एच.ओ. डी. व नेरचे भूमिपुत्र डॉ. आर. टी. बोरसे यांनी क्षयरोग ( टी. बी.) व एच. आय. व्ही. या आजारावर प्रतिबंधात्मक म्हणून अँटी रिप्ट्रो वायरस ट्रीटमेंट शोधून काढली, त्यामुळे देशातील व जगभरातील अनेक रुग्णांना जीवनदान मिळणार आहे. हे काम मोलाचे व अभिमानास्पद आहे व त्यासोबतच डॉ. आर. टी. बोरसे यांनी आपल्या गावाचे नाव देखील उंचवले आहे. डॉ. आर. टी. बोरसे हे आज नेर येथे त्यांच्या निवासस्थानी आले असता त्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला तसेच यावेळी नेर गटाचे जिल्हा परिषद सदस्य श्री. आनंदराव दत्तात्रय पाटील, निंबा बापू खलाने, दिलीप आण्णा सोनवणे , भगवान माने , गुलाब बोरसे, आनंद कारभारी , प्रविण गुरव , बिपीन सोनवणे, रुबाब दादा , सुनील वाघ, सुभाष सोनवणे आदी उपस्थित होते.