डिजिटल युगात स्वतःची ओळख तयार करा : प्रा.भगवान गावित

डिजिटल युगात स्वतःची ओळख तयार करा : प्रा.भगवान गावित२१ शतक हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे आणि या युगामध्ये मानवी तसेच तंत्रज्ञानाची सांगड घालून स्वतःची ओळख तयार करावी असे मत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शंकरराव भेलके महाविद्यालय, नसरापूर येथील वाणिज्य, बीबीए (सीए) व ग्रंथालय विभाग तसेच ” करिअर कट्टा ” अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी “डिजिटल मार्केटिंग” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान देताना प्रा. भगवान गावित यांनी केले सदर कार्यक्रम महाविद्यालयातील बीबीए (सीए) विभागामध्ये आयोजित करण्यात आला होता.पुढे त्यांनी डिजिटल मार्केटिंग ची वाढती गरज विद्यार्थाना लक्षात घेऊन ‘वेबसाईट डेव्हलपर’ तसेच ‘ ब्लॉगर’ या क्षेत्रातील वाढती रोजगार संधी याविषयी विद्यार्थाना सखोल मार्गदर्शन केले. तसेच वेबसाईट कशी तयार करावी आणि ब्लॉग कसा तयार करावा याची प्रात्यक्षिके देऊन अद्ययावत माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा.प्रल्हाद ननावरे वाणिज्य विभाग यांनी वेबसाईट व ब्लॉग तयार करून युवकांनी लाखो रुपये कामे करता येऊ शकते याबाबत विद्यार्थाना प्रोत्साहित केले.या कार्यक्रमाचे आयोजन प्रा.प्रल्हाद ननावरे, बीबीए (सीए) विभागाच्या प्रा.वर्ष तनपुरे तसेच प्रा.ऐश्वर्या धुमाळ यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!