लायन्स व लिओज् क्लब शहादा सातपुडा५ वा पदग्रहण समारंभ संपन्नदि. २० अॉगस्ट २०२३ रोजी लायन्स व लिओज् क्लब शहादा सातपुडा टीमस् २०२३ शपथग्रहण व पदग्रहण समारंभ श्री स्वामी नारायण मंदिर शहादा येथे नुकताच ला. श्रीमती सुमित्रा ईश्वर चौधरी; अध्यक्षा, वर्ष२०२२ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.याप्रसंगी,लायन्स क्लब शहादा सातपुडा चे पदाधिकारीला. प्राचार्य ईश्वरभाई चौधरी (अध्यक्ष), ला. अॅड. गोविंद पाटील (खजिनदार), ला. श्रीमती सुमित्रा चौधरी (सचीव) सोबत ला. भगवान चौधरी, नूतन सदस्य; पदमसिंग गिरासे, किशोर पाटील, शरद पाटील, शिरीष पाटील, शर्मिला पाटील टीम २०२३ यांना पदग्रहण साठी संस्थापन व शपथ MJF PDG ला. परविंदर सिंघ भाटिया; इंदौर तसेचलिओज् क्लब शहादा सातपुडा २०२३ चे पदाधिकारी; लिओ डॉ अखिलेश चौधरी (अध्यक्ष), लिओ. इंजि. पाटील (खजिनदार), लिओ इंजि. सोबत नूतन सदस्य; इंजि. अभिषेक पाटील, भारती पवार, इंजि. प्रसाद पाटील, जगदेव, धर्मराज गिरासे टीम २०२३ यांना शपथ, संस्थापन व पदग्रहण MJF LCIP ला. मनिंदर सिंघ चांडोक; इंदौर यांनी दिली व दोन्ही क्लबचे विधिवत संस्थापन झाल्याचे जाहीर केले. याप्रसंगी,मा. तहसिलदार श्री. दीपक गिरासे, मा. प्राचार्य मकरंद पाटील, टीम दोंडाईचा, टीम नंदुरबार, रिजनल चेअरमन श्रीमती हिना रघुवंशी लायन्स क्लब प्रतिनिधी सह जायंट माणिक चौधरी, प्राचार्य आय.डी. पाटील, नं.जि. ज्ये. ना. संघ अध्यक्ष प्राचार्य जे.डी. पाटील, कवी मोहन पा., श्री स्वामी नारायण मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष कल्पेश पटेल, डॉ राजेंद्र पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.अतिथी समयोचित स्वागत, श्रद्धांजली व ध्वजवंदन ने कार्यक्रम सुरू झाला.क्लब व फाऊंडेशन च्या माध्यमातून परिसरात सुरू घर तेथे ‘परसबाग’, गाव तेथे ‘ फळबाग’, व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन इ प्रकल्प साठी योगदान करणारे सर्वश्री डॉ कांतीलालजी टाटिया, कल्पेश पटेल, डॉ प्रदीपकुमार पटेल, प्राचार्य एच.टी.पाटील, प्राचार्य सोमजीभाई पाटील, रविंद्र बडगुजर, ला. अजित बाफना, मनोज पाटील, इंकलाब फाऊंडेशन यांचा २०२३ वर्षात विविध प्रकल्पात सहभाग व योगदान साठी पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. वृक्षसंवर्धन मित्र मंडळ चे प्रदीप गणेश पाटील व सहकारी यांच्या अनरद टेकडी प्रकल्पास क्लब व फाऊंडेशन तर्फे वार्षिक रू १०,०००/- (अ. रु दहा हजार) रोख निधी व प्रमाणपत्र देऊन कार्याचा गौरव केला. यावेळी गरजूंना दप्तर, व्हेंडर्स अंब्रेला, शिलाई मशिन, किंडल बुक रिडर, बियाणे वाटप, इ. साहित्य अतिथींच्या हस्ते प्रदान केले.कार्यक्रमाला दोंडाईचा, नंदुरबार चे लायन्स क्लब सदस्य, शहादे कर निमंत्रित उपस्थित राहिले. नूतन अध्यक्ष ला. प्राचार्य ईश्वरभाई चौधरी यांनी क्लब व फाऊंडेशन द्वारा डी. ३२३४ एच-२ च्या मार्गदर्शक सूचना पाळून सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण संवर्धन कार्य अधिक प्रभावी पणे पुढे नेण्याचे अभिवचन दिले. सूत्रसंचालन प्रा. शरद पाटील व आभार प्रदर्शन अॅड गोविंद पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी लायन्स, लिओज् क्लब, जीज्ञासा फाऊंडेशन च्या सदस्यांनी परिश्रम केले. श्री स्वामी नारायण ट्रस्ट शहादा यांनी कार्यक्रमाचे यजमान पद सुचारू पार पाडले. राष्ट्र गीत गायन ने कार्यक्रमाची सांगता झाली. ट्रस्ट तर्फे महाप्रसाद नंतर पदग्रहण समारंभ संपन्न झाला.ला. सुमित्रा चौधरी, सचीव
Related Posts
८०० पैकी १०० दाखले देणार..प्रांताधिकाऱ्यांचे अभिवचन..*अन्यथा सोमवार पासून पुन्हा आंदोलन करणार..जगन्नाथ बाविस्कर यांची स्पष्टोक्ती
*शनिवार पर्यंत ८०० पैकी १०० दाखले देणार..प्रांताधिकाऱ्यांचे अभिवचन..*अन्यथा सोमवार पासून पुन्हा आंदोलन करणार..जगन्नाथ बाविस्कर यांची स्पष्टोक्तीयावल ( गोकुळ कोळी):-* चोपडा…
प्रसिद्ध अभिनेते, साहित्यिक, कवी आणि पत्रकार यांच्या उपस्थितीत आर्यारवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार सोहळा संपन्न..!
प्रसिद्ध अभिनेते, साहित्यिक, कवी आणि पत्रकार यांच्या उपस्थितीत आर्यारवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार सोहळा संपन्न..! मुंबई-दादर (प्रतिनिधी…
रत्नागिरी सिंधुदुर्ग रहिवासी मंडळ-बदलापूर यांचा २२वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न.
*रत्नागिरी सिंधुदुर्ग रहिवासी मंडळ-बदलापूर यांचा २२वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न. .. !* बदलापूर (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) नोकरी व्यवसाय कामधंदा निमित्त बदलापूर…