*शिक्षक दिनी श्री रेकोबा माध्यमिक विद्यालय व एस्.एस्. कुडाळकर हायस्कुल येथील शिक्षकांचा जनजागृती सेवा संस्था व लायन्स क्लब,मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार ———————————————————-* मालवण(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)गुरुविण न मिळो ज्ञान,ज्ञानविण न होई सन्मान.जीवन भवसागर तराया,चला वंदु गुरुराया.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस५सप्टेंबर.हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.याच शिक्षक दिनाचे औचित्य साधून जनजागृती सेवा संस्था,मुंबई व लायन्स क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण तालुक्यातील ग्रामिण भागातील श्री रेकोबा माध्यमिक विद्यालय वायरी भूतनाथ व डाॅ.एस्.एस्.कुडाळकर हायस्कूल,कुडाळकर प्राथमिक शाळा येथील शिक्षक-शिक्षिका यांचा सत्कार जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर व लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र,भेटवस्तू,गुलाब पुष या स्वरूपातील सन्मान हिंदळेकर सर,शिंदोळकर मॅडम,दिघे मॅडम,कुबल सर,गोसावी सर,फणसेकर सर,कोरे सर,चौकेकर सर,मोंडकर मॅडम,खोत मॅडम,साटलकर मॅडम,शिंदे सर,साटम मॅडम,आचार्य सर,गावकर मॅडम व इतर शिक्षकेतर कर्मचा-यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच यावेळी रेकोबा हायस्कूलचे मुख्याध्यापक हिंदळेकर सर व कुडाळकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका साटलकर मॅडम यांनी प्रास्ताविक करुन आपले समर्पक विचार व्यक्त केले.शेवटी आभार प्रदर्शन कुबल सर व आचार्य सर यांनी मानले.याप्रसंगी उद्योजक ला.राजा शंकरदास,ला.वैशाली शंकरदास,ला.राधिका मोंडकर,ला.दिक्षा गांवकर,ला.पल्लवी खानोलकर,ला.मिताली मोंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.शिक्षक दिनीच असा अनपेक्षितपणे सन्मान झाला हे पाहुन शिक्षक वृंद भारावून गेला होता.या शिक्षक दिनी महाराष्ट्रातील इतर शिक्षक बंधु-भगिनींना ऑनलाईन पध्दतीने”आकर्षक सन्मानपत्र पाठवून सन्मान करण्यात आला.
Related Posts
त-हाडी येथे बैलपोळा उत्साहात साजरा.
त-हाडी येथे बैलपोळा उत्साहात साजरात-हाडी:-प्रतिनिधी ज्ञानेश्वर सैंदाणे उत्सव:सर्जा-राजाला सजवत मिरवणुका ; शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथे आज सायंकाळी 5 वाजेला वाजत…
अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भेलके महाविद्यालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन
*मा.अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भेलके महाविद्यालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन*….पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शंकरराव भेलके महाविद्यालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच…
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ उत्तर महाराष्ट्र संपर्क कार्यालय नंदुरबार येथे उद्घाटन व कार्यकर्ता प्रवेश सोहळा कार्यक्रम संपन्न…
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ उत्तर महाराष्ट्र संपर्क कार्यालय नंदुरबार येथे उद्घाटन व कार्यकर्ता प्रवेश सोहळा कार्यक्रम संपन्न… नंदुरबार/प्रतिनिधी या कार्यक्रमात…