गो -मय बीज राखी महाराष्ट्रभर ; महा एनजीओ फेडरेशनचा अभिनव उपक्रम

गो -मय बीज राखी महाराष्ट्रभर ; महा एनजीओ फेडरेशनचा अभिनव उपक्रम

महा एनजीओ फेडरेशन द्वारा महाराष्ट्रातील १०० ठिकाणी १०० सामाजिक स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून गोमय बीज राखी महाराष्ट्रभर पोहचविण्याचा संकल्प श्रीशेखर मुंदडा संस्थापक : महा एनजीओ फेडरेशन व नवनिर्वाचित महाराष्ट्र गोसेवा आयोग अध्यक्ष यांनी केला होता. जवळपास महाराष्ट्र भर २५०० पेक्षा अधिक सामाजिक स्वयंसेवी संस्था फेडरेशनसोबत महाराष्ट्रभर जोडल्या गेल्या आहेत. प्रत्येक महिन्यात असे समाजोपयोगी व नानाविध आदर्श समाजापुढे मांडणारे अभिनव उपक्रम करणारी शिखर संस्था महा एनजीओ परिचित आहे. महा एनजीओ फेडरेशनचे ज्येष्ठ संचालक मुकुंद शिंदे यांनी यासाठी विशेष समन्वय साधला. प्रत्येकाच्या घरात एक देशी गोमाता अपेक्षित आहे की ज्याने अध्यात्मिक व आरोग्याच्याबाबतीत महत्वपूर्ण योगदान दिले जाऊ शकते. गाईचे दुधाशिवाय देखील अन्य गोष्टीमधून आपण आर्थिक साक्षर होऊ शकतो. याचेच उदाहरण म्हणून राखीची निर्मिती आहे. गो आधारित अर्थ व्यवस्था, देशी गाईंचे संगोपन, संवर्धन व संरक्षण व अर्थव्यवस्था या रचनेवर यंदाची मांडणी फेडरेशनने केली आहे. गोशाळा व गोप्रेमीना यातून रोजगार उपलब्ध होऊ शकला. डॉ.श्रद्धा व डॉ.संदीप सबनीस , यांनी यास विशेष सहाय्य केले. अशी माहिती कार्यकारी संचालक अक्षयमहाराज भोसले यांनी दिली. संचालक योगेश बजाज, अमोल उंबरजे, राहुल जगताप , पायल मुजुमदार यांचे देखील विशेष प्रयत्न होते.महा एनजीओ सोबत संलग्न असणाऱ्या नंदूरबार जिल्ह्यातील शहीद भगतसिंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पाडळदे ब्रु !! ता. शाहदा जि.नंदुरबार या संस्थेने हा उपक्रम जिल्हा परिषद शाळा औरंगपूर, ता.शहादा, जि.नंदुरबार येथे गोमय बीज रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना गोमय बीज राख्या बांधण्यात आल्या. सदर गोमय बीज रक्षाबंधन कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा सौ.राजेश्वरी महीरे, उपाधक्ष – सौ.मीनाक्षी बोरसे संस्थेचे सचिव श्री.पंकज अहिरे ,सरपंच – श्री एकनाथ ठाकरे , उपसरपंच श्री आनंद शेवाळे , ग्रामसेवक श्री. हेमंत पाटील ग्रामस्थ यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच शाळेतील मुख्याध्यापक श्री.उपेंद्रराज देवढे उपशिक्षक श्री.भोसले सर , उपशिक्षक श्री.माकत्या वळवी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!