शहादा तालुक्यात ग्रामीण भागात पावसाचे झाले आगमन
प्रतिनिधी:- तेजराज निकुंभे
शहादा, ता. ०६ : गेल्या महिनाभर ओढ दिलेल्या मोसमी पावसाचे शहादा सह परिसरात जोरदार आगमन झाले. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. पाऊस नसल्याने परिसरातील शेतकरी, व्यावसायिकासह नागरिक हवालदिल झाले होते. पावसास सुरवात झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत जुलै महिना कोरडा गेल्याने तसेच धरण क्षेत्रात पाऊस नसल्याने धरणांची पाणी पातळी खालावली होती. पाऊस नसल्याने लोणावळा तसेच ग्रामीण भागातील सोयाबीन, मका पिके करपू लागली होती. लांबलेला पाऊस सुरू झाल्याने परिसरातील शेतकरी वर्ग सुखावला आहे.