*भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी शंकरराव खलाणे यांची निवड:

*नेर:* *भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी शंकरराव खलाणे यांची निवड:* *नेर:* धुळे तालुक्यातील नेर येथील शंकरराव खलाणे यांची भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.तसेच राज्याचे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशान्वये धुळे जिल्हा कार्यकारणी जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी यांनी जाहीर केले असून, नेर चे माजी सरपंच तथा नेरगटाचे गटनेते शंकरराव खलाणे यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी नेमणूक केली आहे. धुळे तालुक्यातील माळी समाजातील प्रभावी नेतृत्व, संघटन कौशल्य व कामाची धडाडी तसेच त्यांचे व्यावसाहिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील काम मोठे आहे. नेर सारख्या 25 हजार लोकसंख्येच्या मोठ्या गावात 10 वर्ष पत्नीसह गावाचा कारभार यशस्वीपणे सांभाळून गावाचा विकास केला आहे व कार्यकर्त्यांचे मोठे जाळे उभे केले आहे. तसेच 5 भावांचे एकत्र कुटुंब पद्धती यशस्वीपणे सांभाळत आहेत. धर्मपत्नी सौ. मनीषा खलाणे यांनी नेर गटाचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून यशस्वी नेतृत्व केले व अनेक निवडणुकांचे भाजपाचे प्रभावी काम करून दाखविले त्यामुळे पक्षाने मोठी जबाबदारी देऊन सन्मान केला आहे. या निवडीने केंद्राचे माजी संरक्षण राज्यमंत्री विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे माजी मंत्री व मा. आ. जयकुमार रावल, माजी मंत्री व आ. अमरीश भाई पटेल, भाजपा जिल्हा अध्यक्ष बबनभाऊ चौधरी, प्रदेश प्रवक्ता संजय शर्मा, जि. प. अध्यक्ष सौ. अश्विनी पवार, माजी जि. प. अध्यक्ष सुभाष देवरे, सुधीर जाधव, मनोहर भदाणे, माजी कृषी सभापती प्रा.अरविंद जाधव, रामकृष्ण खलाणे, संग्राम पाटील, विरेंद्रसिंग गिरासे, राम भदाणे, किशोर संघवी,भाऊसाहेब देसले,देवेंद्र पाटील,माजी जि.प.सदस्य मनीषा खलाणे, माजी प.स.सदस्य ज्योती कपूर,प.स.सदस्य अर्जुन गायकवाड यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!