*नेर:* *हस्ती पब्लिक स्कूलतर्फे महादेव वस्ती नेर शाळेस सचित्र बालमित्र पुस्तक भेट:* *नेर:* धुळे तालुक्यातील नेर येथील महादेव वस्ती जि.प.शाळेस हस्ती पब्लिक स्कूलतर्फे सचित्र बालमित्र पुस्तक भेट देण्यात आले .तसेच रक्षाबंधन निमित्त सामाजिक बांधिलकी जपत तसेच आपल्या हातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी हा प्रामाणिक उद्देश समोर ठेवत दर वर्षाप्रमाणे या वर्षी देखील हस्ती पब्लिक स्कूल दोंडाईचा येथील मा. चेअरमन श्री कैलाश जैन सर यांच्या मार्गदर्शनाखाली हस्ती प्री-प्रायमरी स्कुलच्या मुख्याध्यापिका पूनम पाटील ,हस्ती विद्यारंभ सेमी इंग्लिश बालवाडीच्या मुख्याध्यापिका स्मिता साठे तसेच हस्ती प्री प्रायमरी विद्या कॉलनी च्या समन्वयीका लीना सोनवणे यांच्या उपस्थितीत तसेच वर्गशिक्षिका यांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात आला.यासाठी हस्ती पब्लिक स्कूल येथील विद्यार्थी व पालक यांनी मोलाची मदत केली.सचित्र बालमित्र ही पुस्तके विद्यार्थी,पालक यांच्या मार्फत जमा केली व परिसरातील उपक्रमशील शाळांना ही पुस्तके रक्षाबंधन निमित्त भेट म्हणून देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी दातृत्व गुण जोपासण्यास मदत होते. जिल्हा परिषद शाळा रामी, निमगुळ, टाकरखेडा, वडदे, सावलदे, पथारे तसेच इतर देखील शाळांना ही पुस्तके वाटप करण्यात आली. या वर्षी 650 पुस्तकांचे वाटप करण्यात आले.महादेव वस्ती ही शाळा नवीनच असल्याने तसेच उपक्रमशील असल्याने या शाळेची देखील निवड करण्यात आली.याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री रामभाऊ पाटील श्रीमती निर्मला गढरी, श्री योगेश कोळी तसेच पालक यांनी हस्ती पब्लिक स्कूल चे तसेच रामी शाळेचे मुख्याध्यापक श्री निलेश पाटील व श्री दिपक जाधव यांचे देखील आभार मानले.
हस्ती पब्लिक स्कूलतर्फे महादेव वस्ती नेर शाळेस सचित्र बालमित्र पुस्तक भेट
