*भेलके महाविद्यालयात पालकांसोबत विद्यार्थ्यांनी साजरी केली पुस्तक हंडी..* पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या संस्था वर्धापन दिनानिमित्त शंकरराव भेलके महाविद्यालयामध्ये अनोख्या ‘पुस्तक हंडी’ साहसी खेळाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढविण्याचे माध्यम म्हणजे पुस्तकांबरोबरच साहसी खेळ आहे त्याचबरोबर सांस्कृतिक वारसा समृद्ध करणारे शक्तीपीठ म्हणजे पुणे जिल्हा शिक्षण मंडळ हि संस्था होय असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शितोळे यांनी केले. ‘पुस्तक हंडी’ या उपक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी पालक व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्तिथ होते. महाविद्यालयात उपस्थित झालेल्या पालकांना महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांकडून महाविद्यालयाबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली तसेच पालकांनी केलेल्या सूचना विचारधीन घेण्यात आल्या. या वेळी सौ. दिपा शेटे, श्री. अरूण भिलारे या पालकांनीही आपली मनोगते व्यक्त केली. विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी ‘पुस्तक हंडी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुलांमध्ये ऋषिकेश इंगुळकर आणि त्याचा संघाच्या पथकाला प्रथम क्रमांक तर विद्यार्थिनींमधून साक्षी वाल्हेकर आणि त्यांचा संघाच्या पथकला प्रथम क्रमांक मिळाला. उपस्थितांनी विजेत्या पथकाचे अभिनंदन केले. विजयी पथकाला स्पर्धा परीक्षा, कादंबरी, विविध विषयांवरील संदर्भ पुस्तके देण्यात आली.सदर कार्यक्रमाचे संयोजन प्रा. जीवन गायकवाड, प्रा. प्रल्हाद ननावरे, प्रा.डॉ. राजेंद्र सरोदे, डॉ. हिमालया सकट, डॉ. सहदेव रोडे, डॉ. जगदीश शेवते, प्रा. भगवान गावित, प्रा.डॉ. सचिन घाडगे, प्रा. जाधवर दयानंद, प्रा.प्राजक्ता कापरे, प्रा. कोमल पोमण, प्रा. माऊली कोंडे, प्रा. संदीप लांडगे, प्रा. पौर्णिमा कारळे, प्रा.वर्षा तनपुरे, प्रा. ऐश्वर्या धुमाळ, प्रा. कोळपे महेश, प्रा. ऋतुजा साळुंखे, विकास ताकवले, आशिष परमार,महेश दळवी,सौ.मोहिते, सुरक्षा रक्षक जयप्रकाश यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रल्हाद ननावरे यांनी केले तर आभार प्रा. माऊली कोंडे यांनी मानले.
Related Posts
शंकरराव खलाणे यांचा कापडणे येथील माळी समाजातर्फे सत्कार
*नेर:* *शंकरराव खलाणे यांचा कापडणे येथील माळी समाजातर्फे सत्कार:* *नेर:* धुळे तालुक्यातील नेर येथील उद्योजक तथा धुळे जिल्हा माळी समाजाचे…
ग्रामपंचायत मार्फत माहिती देण्यास टाळा टाळ,मोठा भ्रष्टाचार झाला असावा*
*ग्रामपंचायत मार्फत माहिती देण्यास टाळा टाळ,मोठा भ्रष्टाचार झाला असावा* मोहिदे त.श. येथील ग्रामपंचायत कार्यालयात माहिती अधिकार कायद्या अंतर्गत,श्री.कैलास गुलाब सोनवणे,रा.…
शहादा तालुका भ्रष्टाचार निर्मुलन समितीवर अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या जिल्हाधिकारी यांनी एका आदेशान्वये जाहीर केल्या आहेत.
– शहादा तालुका भ्रष्टाचार निर्मुलन समितीवर अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या जिल्हाधिकारी यांनी एका आदेशान्वये जाहीर केल्या आहेत. शहादा,दि.4(प्रतिनिधी) विविध शासकीय आस्थापनेतील…