भेलके महाविद्यालयात पालक मेळावा उत्साहात संपन्न*

*भेलके महाविद्यालयात पालक मेळावा उत्साहात संपन्न* काही गोष्टी बदलत नाहीत किंवा त्या बदलण्यास वेळ लागतो. तसाच पालकांचा पूर्वापार चालत आलेला दृष्टीकोन म्हणजे शिक्षकच पाल्यांना शिकवतात किंवा त्यांचे भविष्य घडवितात. परंतु शिक्षक ही केवळ एक बाजू आहे. विद्यार्थी पूर्ण होण्यास शिक्षक व पालक या दोन्ही बाजूंची गरज असते असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ तुषार शितोळे यांनी केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून महाविद्यालयातील उपलब्ध सुविधांची माहिती देणे, पालक म्हणून मुलांना काय शिकवू शकतो? त्यांच्या शिक्षणासाठी शासन कशा प्रकारे मदत करते ? कशी मदत करते ? शिक्षणात पालकांची भूमिका काय? याव अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांची माहिती पालकांना देण्यासाठी शंकरराव भेलके महाविद्यालयात पालक मेळावा आयोजित करण्यात आला. करिअर कट्टा,शिष्यवृत्ती, क्रेडिट पॅटर्न, नवीन शैक्षणिक धोरण, कमवा व शिका योजना, राष्ट्रीय सेवा योजना, पुस्तक पेढी योजना, क्रीडा सुविधा, व्यायामशाळा इ.महाविद्यालयातील सुविधांची माहिती प्रा डॉ राजेंद्र सरोदे, प्रा.सहदेव रोडे,प्रा. भगवान गावित, डॉ.सचिन घाडगे यांनी पालकांना दिली. यावेळी उपस्थित असणाऱ्या महिला प्राध्यापकांनी महाविद्यालयातीलविद्यार्थिनींसाठी असणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली. यावेळी सौ. दिपा शेटे, श्री. अरूण भिलारे, श्री. विजय थिटे, सौ. वनिता बुर्डे, श्री एसव्ही खानिस, श्री वैजनाथ माने, सौ शुभांगी बनसोडे या पालकांनी आपली मनोगते व्यक्त केली. महाविद्यालयात ट्रेनिंग व प्लेसमेंट सेंटर अधिक कार्यक्षम करण्याचे व विद्यार्थ्यांचे इंग्रजी संभाषण कौशल्य सुधारण्यासाठी प्रयत्न करावे अशा पालकांनी सूचना केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. जगदीश शेवते तर आभार प्रदर्शन प्रा. प्रल्हाद ननावरे यांनी केले.सदर कार्यक्रमाचे संयोजन डॉ. जगदीश शेवते,प्रा.डॉ. राजेंद्र सरोदे,डॉ.हिमालया सकट, डॉ. सहदेव रोडे, प्रा. भगवान गावित, प्रा. पौर्णिमा कारळे,प्रा. जीवन गायकवाड, प्रा. प्रल्हाद ननावरे, प्रा.प्राजक्ता कापरे, प्रा.कोमल पोमण, प्रा. माऊली कोंडे, प्रा. संदीप लांडगे, प्रा.डॉ. सचिन घाडगे, प्रा. जाधवर दयानंद, प्रा.वर्षा तनपुरे, प्रा. ऐश्वर्या धुमाळ,प्रा. कोळपे महेश, प्रा. ऋतुजा साळुंखे, विकास ताकवले, आशिष परमार,महेश दळवी,सौ.मोहिते, सुरक्षा रक्षक जयप्रकाश यांनी महाविद्यालयाचे प्राचार्यडॉ. तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!