ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि पंचक्रोशी कोळंब आयोजित रक्तदान शिबिरात६२रक्तदात्यांनी केले रक्तदान

ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि पंचक्रोशी कोळंब आयोजित रक्तदान शिबिरात६२रक्तदात्यांनी केले रक्तदान ———————————————————–मालवण(गुरुनाथ तिरपणकर-अमित खोत)-ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि पंचक्रोशी कोळंब यांच्या वतीने कोळंब येथील हाॅटेल मालवणी येथे आयोजित रक्तदान शिबिरात६२रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदानात महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग होता.रक्तदान शिबिर आयोजनात हाॅटेल मालवणी आणि लायन्स क्लब मालवण यांचे विशेष सहकार्य लाभले.रक्तदान शिबिराचे उदघाटन कोळंब ग्रामपंचायत सदस्या सौ.नंदा गावकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सरपंच सिया धुरी,उपसरपंच विजय नेमळेकर,लायन्स क्लब अध्यक्ष विश्वास गावकर,रोटरी क्लब अध्यक्ष अभय कदम,आंबा उद्योजक अवी नेरकर,विनायक धुरी,लाड सर,मंगेश चव्हाण,विशाल फणसेकर,डाॅ.प्रशांत पवार,डाॅ.गार्गी ओरसकर,आबा भोजने,महेश कुर्ले,प्रविण देसाई,प्रदीप कुर्लेकर,सचिन तळाशीलकर तसेच निवृत्त उप मुख्य अधिकारी राजेंद्र पराडकर,जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर,लायन्स क्लब अध्यक्ष विश्वास गावकर,उमेश शिरोडकर,सौ.पल्लवी खानोलकर,सौ.वैशाली शंकरदास,सौ.अनुष्का चव्हाण,सौ.नंदिनी गावकर,सौ.दीक्षा गावकर,सौ.राधिका मोंडकर,सौ.रुपा कुडाळकर सर्व ग्लोबल रक्त संघटक मालवण राजु बिडये,उद्योजक आणि समाजसेक राजा शंकरदास,अमेय देसाई,विकास पांचाळ,अंकुश कातवनकर,सौ.राधा गोविंद केरकर,सौ.कविता वेंगुर्लेकर,निलेश गवंडी,तेजस नार्वेकर,संदीप पेडणेकर,प्रियाल लोके,स्वाती सावंत,सौ.भूमिका म्हापनकर,सौ.शितल साठे,ग्लोबल रक्तदाते विजय पांचाळ,आणि रक्तमित्र परिवार उपस्थित होता.ओरस रक्तपेढी ओरस स्टाफ डाॅ.सुशील परब,सुरेश डोंगरे,निरुकीकर,प्रांजली परब,मयुरी शिंदे नितीन गावकर यांचे साहाय्य लाभले.अमित खोत,महेंद्र पराडकर,तेजस निव्हेकर,प्रमुख आयोजक हाॅटेल मालवणीचे मालक गणेश कोळंबकर व सौ.नेहा कोळंबकर डॅनिश लुगेरा,सौ.प्रज्ञा लुगेरा या उभयतांनी रक्तदान केले.सत्यवान बापूसाहेब खोंगे(हाॅटेल मालवणी स्टाफ)यांनी शिबिरात आपले वैयक्तिक ५०वे रक्तदान केले.हाॅटेल मालवणीचे सर्वेसर्वा तथा ग्लोबल संघटक गणेश कोळंबकर व सौ.नेहा कोळंबकर यांचा मुलगा आराध्य याचा वाढदिवस सर्व रक्त मित्र परिवाराने केक कापून साजरा केला.सामाजिक कार्यकर्ते मंगेश उर्फ बाबू ढोले यांचाही यावेळी ग्लोबल परिवारातर्फे सन्मान करण्यात आला.सर्व रक्तदाते आणि पंचक्रोशी कोळंब उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व सन्मान करण्यात आला.तसेच सर्व रक्तदात्यांना संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह देण्यात आली.रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी गणेश कोळंबकर व सौ.नेहा कोळंबकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!