*दोंडाईचा एस.टी. आगारातुन शहादा बस दररोज सकाळी १०.३० ते ११ वाजे दरम्यान सुरू होणे बाबत*( प्रतिनिधी गोपाल कोळी ) निमगुळ ता. शिंदखेडा येथे विविध संस्थांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते शिवसेनेचे तालुका पातळीवरील पदाधिकारी आणि शालेय महाविद्यालयिन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत शहादा आगार व्यवस्थापक भाई यांना नियमितपणे स्पेशल बस सुरू करण्या बाबत निवेदन देण्यात आले. या प्रसंगी शहादा आगारात विद्यार्थी विद्यार्थिनी यांची होत असलेली गैरसोय आणि शैक्षणिक नुकसान यासंदर्भात आगार व्यवस्थापक भोई यांना माहिती देण्यात आली. निमगुळ येथे विना थांबा बस यांना अधिकृत थांबा देणे आवश्यक आहे असे .शिवसेनेचे तालुका युवा प्रमुख उमेश बागल यांनी मागणी केली परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल आणि इतर प्रवाशांची देखील सोय होईल अशी ठाम भूमिका घेत निमगुळ कल्याण बागल म्हणाले की, हा प्रश्न बरेच दिवस प्रलंबित होता. प्रवाशी, विद्यार्थी विद्यार्थिनी यांना नियमितपणे हा त्रास सहन करावा लागत होता आज या प्रश्नाला वाचा फोडून ही गैरसोय कायमस्वरूपी थांबविण्यात येईल असा मला विश्वास आहे. या प्रसंगी पदाधिकारी शिवसेनेचे माजी विभागीय आणि निमगुळ चे माजी उपसरपंच कल्याण बागल तसेच शिवसेनेचे तालुका युवा प्रमुख उमेश बागल,प्रकाश बागल भाजप तालुका माजी अध्यक्ष आणि चंद्रकांत शिरसाठ, वासुदेव शिंदे,बाळा पाटील, भुपेंद्र बागल विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते तसेच शाळेचे शिक्षक यांच्या उपस्थितीत शहादा बस आगार प्रमुख यांना विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत स्वतंत्र स्पेशल बसची मागणी करणारे निवेदन देण्यात आले. यावेळी आगार व्यवस्थापक भोई साहेव यांनी मागणी तात्काळ मंजूर करून सर्व विना थांबा बस देखील निमगुळ बस स्थानकांवर थांबतील आणि विद्यार्थ्यांच्या सोईसाठी स्पेशल बस लवकरच सुरू करण्यात येईल असे ठामपणे सांगितले. निमगुळ ग्रामस्थांचे निवेदन स्विकारून शहादा आगार विद्यार्थ्यांची होणार गैरसोय लवकरच थांबविण्यात येईल असे आश्वासन भोई यांनी ग्रामस्थांना दिले. यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
Related Posts
वाघाडी येथील जवान लान्स नायक मनोज संजय माळी यांच्यावर उद्या रविवार सकाळी 10वा. शासकीय इतमाात होणार अंत्यसंस्कार:
धुळे: वाघाडी येथील जवान लान्स नायक मनोज संजय माळी यांच्यावर उद्या रविवार सकाळी 10वा. शासकीय इतमाात होणार अंत्यसंस्कार:धुळे: शिरपूर तालुक्यातील…
अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भेलके महाविद्यालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन
*मा.अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भेलके महाविद्यालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन*….पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शंकरराव भेलके महाविद्यालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच…
माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांच्या खुनाची सखोल चौकशी तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी | माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची मागणी*
*माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांच्या खुनाची सखोल चौकशी तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी | माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची…