शासन परिपत्रकानुसार माहिती अधिकार दिन साजरा करा – माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशनची मागणीजळगाव – शासन परिपत्रकानुसार 28 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात यावा या मागणीचे निवेदन माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्यावतीने ( महासंघाच्यावतीने ) जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद व जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. एम राजकुमार यांना देण्यात आले आहे, तसेच जळगाव महानगरपालिका आयुक्त व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ई-मेलने पाठवण्यात आले आहे. सदर निवेदनात म्हणण्यात आले आहे की , ” माहिती अधिकार हा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा असून या कायद्याचा प्रसार व प्रचार करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे. तसेच या कायद्याचे महत्त्व व उपयोगिता सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच सामान्य नागरिक यांना व्हावी यासाठी शासकीय आस्थापना म्हणून आपली जबाबदारी आहे. आंतराराष्ट्रीय स्तरावर २८ सष्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने २८ सष्टेंबर हा दिवस महाराष्ट्र शासन अधिनस्त प्रत्येक सरकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा असा शासन निर्णय क्रमांक- केमाअ २००८/ पत्र क्र.३७८/०८/सहा सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई दिनांक :२० सप्टेंबर २००८ रोजी घेतला आहे. सदर शासन निर्णयाची एक प्रत या पत्रासोबत जोडलेली आहे. सदर निर्णयानुसार दर वर्षी सर्व शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिन साजारा करण्याचे शासनाचे आदेश आहे. या निर्णयानुसार माहिती अधिकार या विषयावर विविध उपक्रम साजरे करून तसेच प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्धी देऊन नागरिकांना या माहिती अधिकार दिन उपक्रमात सहभागी करून घ्यावे व त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थाची मदत घ्यावी असे शासनाने सूचविलेले आहे. त्याची आपल्या शासकीय कार्यालयात अंमजबजावणी व्हावी. या वर्षी २८ सप्टेंंबर २०२३ या दिवशी अनंत चतूर्दशी तसेच ईद ए मिलाद या सणांची सूटटी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे २८ सष्टेंबर रोजी शक्य नसल्यास सदर माहिती अधिकार दिन हा २७ सष्टेंबर २०२३ किंवा २९ सष्टेंबर २०२३ या दिवशी साजरा करावा तसेच तशा सूचना आपल्या अधिनस्त सर्व शासकीय कार्यालयाला तातडीने कराव्यात.” याप्रसंगी माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , योगेश चौधरी , शैलेंद्र सपकाळे , नरेंद्र सपकाळे , सुवर्णा तायडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Related Posts
अवैध दारू अड्डे बंद करा जनक्रांती मोर्चाची मागणी
अवैध दारू अड्डे बंद करा जनक्रांती मोर्चाची मागणीजळगाव -यावल तालुक्यातील पाडळसे गावात बेकायदेशीर अवैध दारू अड्डे बेसुमारपणे चालू असून या…
बाहेर गावी नोकरी, तसेच व्यवसाय करत असलेल्या ढेकू खुर्द गावातील मित्रानी एकत्र येऊन.आपण समाजाचे काही तरी देणं लागतो हा उद्देश समोर ठेवून *”एकच ध्यास गावाचा विकास*
अमळनेर प्रतिनिधी- बाहेर गावी नोकरी, तसेच व्यवसाय करत असलेल्या ढेकू खुर्द गावातील मित्रानी एकत्र येऊन.आपण समाजाचे काही तरी देणं लागतो…
प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत ची अटकेचा युवक काँग्रेस तर्फे निषेध
*प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत ची अटकेचा युवक काँग्रेस तर्फे निषेध* यावल : येथील रावेर यावल युवक काँग्रेस तर्फे तहसीलदार विनंते…