शहाद्यात सहिष्णू जाती धर्माच्या लोकांची सलोखा समिती गठीत.

शहाद्यात सहिष्णू जाती धर्माच्या लोकांची सलोखा समिती गठीत. शहादा,दि.12 दि.11सप्टेंबर सोमवारी येथील सावित्रीमाई फुले व महात्मा फुले यांच्या स्मारका जवळ लोकशाही जागर समितीच्या वतीने सलोखा समितीची बैठक आयोजित केली होती.या बैठकीत सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सलोखा समिती स्थापन करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात शहादा शहरात गणेशोत्सव, नवरात्र, दसरा,दिवाळी असे सार्वजनिक आनंदाचे उत्सव येऊ घातले आहेत.त्या पार्श्वभूमीवर शहादा शहरात गणेशोत्सव मिरवणूकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये.व धर्माधर्मात द्वेषाचे व संशयाचे वातावरण तयार होऊन दंगलसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून लोकशाही जागर समितीच्या वतीने सलोखा समिती स्थापन करून शहाद्याच्या सर्व जातीधर्माच्या लोकांना या सणांचा निव्वळ आनंद उपभोगायचे आवाहन करण्यात येत आहे.सलोखा समिती या सण उत्सवात कार्यरत असणाऱ्या पोलिसांना मदत करणार आहे.जेथे जेथे ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता असेल तेथे प्रेमपूर्वक व शांततेने उत्सव पार पडावा यासाठी प्रयत्न करणार आहे.या अगोदर गणेश उत्सवा दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील शहादा व नंदुरबार येथे काही घटना घडल्या आहेत. त्या घटनांमुळे सर्व सामान्य माणसाच्या जगण्याची परवड झाल्याचेही दिसून आले आहे.असे अनुचित प्रकार घडू नये व सर्व सामान्य जनजीवन विस्कळित होऊ नये यासाठी शहादा शहरातील सहिष्णू व जागरूक नागरिकांनी ही सलोखा समिती गठीत केली आहे.या सलोखा समितीचे सक्रीय सदस्य म्हणून पुष्पेंद्र सामुद्रे, शिवाजी महाले,गोटू धनगर, बलवंत देवरे,हाजी शाकीर खाटिक, तबरेजभाई पठाण, निजाम मिस्तरी, लक्ष्मण निकुंभे, रमेश बिरारे, किशोर मगरे, संतोष पवार, हिरालाल मुसळदे, राजकुमार पावरा,संजय अहिरे, राजेंद्र वाघ, नरेंद्र कुवर, आझाद माळी, मिलिंद माणिक,छोटू कुवर तराडीकर, सुरेश रेता मोरे, कृष्णा कोळी, संतोष कुवर,चेतन गांगुर्डे, ज्ञानेश्वर सोनवणे , रघुनाथ बळसाणे, सुभाष नागो भिल,दिलवरसिंग पाडवी, विश्वास जगदेव, प्रदीप केदारे, चंद्रसिंग बरडे, रंजनाताई कान्हेरे, चुनिलाल ब्राम्हणे , दादाभाई पिंपळे यांची ठरावाद्वारे नेमणूक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!