माळी समाजाच्या वतीने शंकरराव खलाने यांचा सत्कार

*माळी समाजाच्या वतीने शंकरराव खलाने यांचा सत्कार:* *नेर:* धुळे तालुक्यातील नेर येथील माजी सरपंच शंकरराव खलाने यांना नुकत्याच जाहीर झालेल्या भाजपा कार्यकारणी मध्ये धुळे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झालेली असून माळी समाजाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.तसेच विशाल माळी समाजाचे आदरणीय जेष्ठ नेतृत्व,आदर्श कुस्तीपटू,माजी नगरअध्यक्ष धुळे आप्पासाहेब हनुमंतराव वाडीले यांच्या कार्यप्रणाली आणि कर्म,कर्तुत्व आणि संघटन कौशल्य बघून आज रोजी संपूर्ण माळी समाज एकजुटीने एकवटून तरुण तडफदार असं नेतृत्व आदरणीय शंकरराव हिरामण खलाने माजी सरपंच नेर त्याचप्रमाणे मा सरपंच व माजी जिल्हा परिषद सदस्य सौ मनीषा शंकरराव खलाने यांचा सामाजिक शैक्षणिक राजकीय कामकाजाची शैली बघून सर्वोत्तम पक्ष भाजपा यांनी विश्वासाचे नाते जोडून माळी समाजाला मोठे स्थान देऊन जिल्ह्याचे उपाध्यक्ष पद बहाल केलं, आणि त्या उपाध्यक्ष पद दिल्यामुळे संपूर्ण माळी समाजात एक जल्लोषाचे नव वातावरण निर्माण झालं, पुढील मार्गक्रमण व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.व कौतुकी करण्यात आले. यावेळी माळी समाजाचे जेष्ठ नगराध्यक्ष धुळे येथील आप्पासो हनुमंतराव वाडीले,प्राचार्य सुरेश चौधरी,जाधव सर,हभप विठोबा माळी,उद्यान पंडीत विलासराव माळी,कैलास माळी,डॉ.मधुकर चौधरी,त्याचप्रमाणे समता परिषद व माळी महासंघ मार्फत खंडलाय ग्रा.पं.गटप्रमुख आबा पगारे,जेष्ठ समाजसेवक यशवंत नाना,आनंदा पाटील,मा.सैनिक दिनेश बागुल,हभप अनिल महाराज, नेरचे आदरणीय प्रकाश खलाने,अनंत वाडिले,आर डी माळी,नामदेव बोरसे आदि उपस्थित होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!