*विविध पुरस्कारांसाठी माहिती पाठवा !* मुंबई(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) धारावीतून प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक भगवे वादळच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित साहित्य,वृत्तपत्रलेखन,पत्रकारिता,सामाजिक,शैक्षणिक, उद्योजक, शेती ,क्रीडा व राजकीय स्तरांवर भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. यावेळी जेष्ठ पत्रकार यांना प्रबोधनकार ठाकरे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, वृत्तपत्र लेखकांना दर्पणकार बाळशात्री जांभेकर पत्रभूषण गौरव पुरस्कार, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समजसेवकास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार ,सिंधु ताई सपकाळ स्मृती पुरस्कार,माता रमाबाई रानडे समाजभूषण पुरस्कार, शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या शिक्षकांना सावित्रीबाई फुले शिक्षकरत्न पुरस्कार,महात्मा जोतिबा फुले शिक्षकरत्न पुरस्कार ,शिक्षण महर्षी धोंडो केशव कर्वे पुरस्कार, कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षक रत्न पुरस्कार,साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या साहित्यिकांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्काराने तर संस्था आणि संघटना यांना आचार्य विनोबा भावे पुरस्कार तर उद्योग आणि शेती क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकरी आणि उदयोजक यांना सुद्धा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून तरी इच्छुक व्यक्तींनी आपल्या संपूर्ण माहितीसह दिनांक 10 ऑक्टोबर पर्यंत संपादक श्री दत्ता खंदारे यांच्या 9699313621या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
विविध पुरस्कारांसाठी माहिती पाठवा !
