*जिल्हा परिषद सदस्या (उ.बा.ठा. गट ) सौ.सुनिता शानाभाऊ सोनवणे यांनी जि.प. सर्वसाधरण सभेत आक्रमक भुमिका मांडली*( प्रतिनीधी गोपाल कोळी )शिंदखेडा तालुक्याचे प्रभारी आहेमी मागील सभेत शिंदखेडा तालुक्यात पंचायत समिती शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत असा प्रश्न मांडला होता त्या वेळी अधिकारी लोकांनी उडवा उडविचे उत्तर मिळाले होते. आज सुध्दा सर्वसाधारण सभेत मागील मुद्दा उपस्थित केला होता. त्याप्रसंगी संदर्भात अध्यक्षां व सि.ई.ओ. साहेबांनी उत्तर द्यावे.अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनिता ताई सोनवणे यांनी जि.प. सभागृहात केली होती. बी.डी. ओ. प्रभारी अतिरिक्त बि.डी.ओ. प्रभारी कृषी अधिकारीगटशिक्षणाधिकारी प्रभारीबांधकाम विभाग उपअभियंता प्रभारी पाणीपुरवठा विभाग उपअभियंता प्रभारी अंगणवाडी सी.डी. P.O.- प्रभारीऐवढेच काय तर इतर कर्मचारी पदे देखील शिंदखेडा तालुक्यात प्रभारी आहेत व अनेक जिल्हा परिषद शाळेत शिक्षक नाही आहे. शिक्षकांच्या शिंदखेडा तालुक्यात एकुण १२९ पदे रिक्त आहेतशिरपुर, साक्री व धुळे तालुक्यात नाही आहेत ऐवढी पद रिक्त मात्र हा अन्याय फक्त शिंदखेडा तालुक्यावरच का ? करता आहेत मी मागील सभेत देखील बोलले होते कि शिंदखेडा तालुक्याला कोणी वाली आहे किंवा नाही आतातर अस म्हणण्याची वेळ आली आहे की कुठे नेऊन ठेवला तुम्ही माझा शिंदखेडा तालुका गल्ली ते दिल्ली पर्यंत भाजपा ची सत्ता आहे आणि शिंदखेडा तालुक्यातून १० पैकी ८ जिल्हा परिषद सदस्य हे भाजपाचे आहेत ते पण या विषयावर आवाज उठवत नाही हे या तालुक्याचे दुर्देव समजावे लागेल पुढील निवडणुकीत आपण जनते कडे मत मांगण्यासाठी जाणार आहोत तेव्हा लोकांना काय सांगणार आम्ही हा संपूर्ण शिंदखेडा तालुका प्रभारी अधिकारींच्या ताब्यात दिला आहे असे म्हणणार का .एम.आर.जी.एस.सिंचन विहीरीत २०१९ पासुन शिंदखेडा तालुक्यात शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही याचे काय कारण आहे ते सभागृहात सांगता येईल ते सांगावे मी असे ही ऐकले आहे की सत्ताधारी सांगतील तेवढ्याच लोकांना सिंचन विहीर द्यावेत विरोधी गटातील शेतकऱ्यांना देऊ नये त्यामुळे माजी बी.डी.ओ. डि.एम.देवरे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते शेवटी त्यानी बदली करुन घेतली हे खरे आहे का नविन बि डी ओ बोलवले आहेत .त्यानी देखील सिंचन विहिर मंजूर केल्या नाहीत व ते देखील प्रभारीच आहेत आणि असे असेल तर हे बर नाही जो शेतकरी गरिब आहे आणिलाभपात्र आहे त्यांना सरसकट सिंचन विहीर मंजूर करावे जर तसे झाले नाही तर यांच्या मुळे शेतकऱ्यांचे आर्थिक प्रचंड नुकसान होत आहे कारण शिंदखेडा तालुका दुष्काळी तालुका आहे याचे भान प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी ठेवले पाहिजे मागिल आऑगस्ट महिन्यात पाऊस झाला नाही म्हणून शेतकऱ्यांची पिक कोमजली आहेत जर का त्यांच्या कडे सिंचन विहीरी झालेल्या असत्या तर पिके वाचली असती ज्यांच्याकडे विहीर होती त्या थोड्याफार शेतकऱ्यांची पिके वाचली बाकी शेतकऱ्यांचे पिकांची मोठी नुकसान झाले आहे म्हणून शेतकऱ्यांच्या एम.आर.जि.एस. च्या विहीरी तात्काळ मंजुर कराव्यात व शिंदखेडा तालुक्यात कायम स्वरुपी अधिकारी नियुक्ती करावेत अन्यथा जिल्हा परिषद कार्यालयाला कुलुप ठोकुन उपोषण आंदोलन करणार
Related Posts
शहादा शहरात गटार व नाले सफाई करण्यात यावी युवक काँग्रेस कमिटी तर्फे मुख्यधिकारी शहादा यांना निवेदन सादर
शहादा शहरात गटार व नाले सफाई करण्यात यावी युवक काँग्रेस कमिटी तर्फे मुख्यधिकारी शहादा यांना निवेदन सादर..शहादा शहरात नगर पालीका…
चोपडा येथे अन्नत्याग सत्याग्रह उपोषणला जि.प.गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांची भेट
चोपडा येथे अन्नत्याग सत्याग्रह उपोषणला जि.प.गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांची भेटयावल (प्रतिनिधी ) चोपडा येथील तहसिल कार्यलया जवळ गोरगावले येथील…
चिमठाणे येथे वाळू विरोधात गावकऱ्यांचा रास्ता रोको…
चिमठाणे येथे वाळू विरोधात गावकऱ्यांचा रास्ता रोको… चिमठाणे येथे बूराई नदी पात्रात रात्रंदिवस उपसा चालू आहे लाखो रुपयाची रेती रोजची…