आकांक्षा अहिरे हिची उच्च शिक्षणासाठी आयरलॅंड विद्यापीठात निवड

*आकांक्षा अहिरे हिची उच्च शिक्षणासाठी आयरलॅंड विद्यापीठात निवड:* *नेर:* धुळे तालुक्यातील आनंदखेडे येथील विद्याप्रसारक मंडळ खेडे, ता. जि. धुळे संस्थेचे संस्थापक व माजी कार्याध्यक्ष कै. आप्पासाहेब सुकदेव सोमजी माळी यांची नात व संस्थेच्या अध्यक्षा व कै. ग. द. माळी (गुरुजी) कनिष्ठ महविद्यालय खेडे येथील भौतिकशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका सौ. सुरेखा तिर्थदास अहिरे व संस्थेचे सचिव व सेवानिवृत्त प्राचार्य श्री. तिर्थदास सुकदेव अहिरे यांची सुकन्या कु. आकांक्षा अहिरे हिची उच्च शिक्षणासाठी आयरलॅंड येथील ” मेनूथ ” विद्यापीठात ” डेटा सायन्स अँड अनॅलेटिक ” या विषयात ” एम.एस. ” साठी निवड झाली आहे. *कु. आकांक्षाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जयहिंद हायस्कूल येथे तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण ” होरायझन इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पुणे ” येथे झाले आहे. तिने ” श्री. विलेपार्ले केळवाणी मंडळांचे द्वारकादास जे. संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, विलेपार्ले, मुंबई ” येथून बी. ई. ( मेकॅनिकल ) ची पदवी संपादन केली. कॅम्पस इंटरव्ह्यूत निवड होऊन इन्फोसिस कंपनीत चेन्नई येथे ” सिनियर सिस्टिम इंजिनिअर ” म्हणून तीन वर्षे नोकरी केली. तिचा भाऊ अभिषेक आहिरे यांनेही जर्मनीतील विद्यापीठातून एम. एस. ची पदवी संपादन केलेली आहे. तसेच आकांक्षाने विदेशातही घवघवीत यश संपादन करून नावलौकिक प्राप्त करावा व आपले कुटुंब, समाज, शाळा आणि गावाचे नाव उज्वल करावे. ज्योतिबा सावित्री आईचा वसा अंगिकारावा व समाजोन्नतीस भावी काळात हातभार लावावा.आकांक्षाच्या भावी उज्वल वाटचालीसाठी खेडे विद्याप्रसारक मंडळ संस्थेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, प्राचार्य,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, आप्तेष्ट व नातेवाईक यांनी शुभेच्छा दिल्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!