अक्कलकुवा पंचायत समीतीचे कारभार वाऱ्यावर -ॲड. रुपसिंग वसावे

अक्कलकुवा पंचायत समीतीचे कारभार वाऱ्यावर -ॲड. रुपसिंग वसावे ————————————-अक्कलकुवा (प्रतिनिधी)राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मेलद्वारे निवेदन पाठवविण्यात आले. निवेदनात म्हटले की,दि.11/09/2023 रोजी दुपारी 4:00 वाजेच्या सुमारास अक्कलकुवा पंचायत समीती सामान्य प्रशासन विभागाचे श्री. अरविंद अहिरे (सहाय्यक प्रशासन अधिकारी) यांचेकडे कामानिमीत्त गेलो असता ते टेबलावर आढळुन आले नाही, त्या संदर्भात रितसर वरीष्ठ कार्यालयात तक्रार पाठवीली आहे. असे असतांना दि.12/09/2023 रोजी पुन्हा पंचायत समिती, अक्कलकुवा येथील अधिकान्यांची भेट घेणेकरीता सकाळी 10:00 वाजेच्या सुमारास कार्यालयात गेलो असता कार्यालयात सुकसुकाट दिसुन आले.अक्कलकुवा तालुक्यातील रहिवासांच्या सोयीसाठी प्रशस्त अशी मिनी मंत्रालयाची उभारणी करण्यात आली, मात्र एखाद्या शासकीय कार्यालयाचे वरीष्ठ अधिकारी कामानिमीत्त बाहेर गेल्यास तेथील बहुतेक कर्मचारी आपल्या खुर्चीवर आढळत नाही. त्यामुळे अक्कलकुवा येथील पंचायत समितीत शासकीय कामाचा खडोंबा होतो, हि बाब दि. 11/09/2023 रोजी देखील उघडकीस आली होती, त्यामुळे पंचायत समिती कार्यालयाचा कारभार कशा चालतो याची प्रत्यक्ष माहिती घेणेसाठी पंचायत समिती, अक्कलकुवा येथे फेरफटका मारला असता बहुतेक कर्मचारी टॅबलावरून बेपत्ता असल्याचे दिसून आले. अक्कलकुवा पंचायत समिती अंतर्गत एकुण 76 ग्रामपंचायती आहेत. संबंधित गावांतील नागरीक आपले कामे घेऊन येथे येतात परंतु कर्मचारी कामावर वेळेवर उपस्थित राहत नसल्याची बाब अनेकदा उघडकीस आली आहे. त्यामुळे दुर्गम भागातून आलेल्या नागरीकांना या महाशयांची दिवसभर प्रतीक्षा करुनही त्यांना काम न होता घरी निघून जावे लागते. अक्कलकुवा पंचायत समिती अंतर्गत बांधकाम विभाग, कृषी शिक्षण व पाणीपुरवठा यासारखे विभाग आहेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरीकाला अकारण आर्थिक मुरदंड सोसाया लागतो, गटविकास अधिकारी कक्षाची पाहणी केली असता कार्यालयाचा दरवाजा बंद स्वरुपात दिसून आला व सहाय्यक गटविकास अधिकारी यांचा कार्यालयाला देखील कुलूप असल्याचे दिसून आले. शिक्षण विभागात वरीष्ठ सहाय्यक अधिकारी वगळता अन्य कोणतेही कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नसल्याचे दिसून आले. सामान्य प्रशासन विभागात 2 ते 3 कर्मचारी वगळता कोणीही उपस्थित नसल्याचे समोर आले. कृषी विभागातील खुर्च्या अधिकाऱ्या विना रिकामी होती अशा परीस्थितीत अक्कलकुवा तालुक्यातील जनतेची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून येथील दांडीबहादुर कर्मचान्यांची तात्काळ वेतन व भत्ते थांबविण्यात येऊन त्यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अन्यथा तसे न झाल्यास दि. 18/09/2023 रोजीपासून पंचायत समिती, अक्कलकुवा यांच्या आवारात बेमुदत आंदोलन करण्यात येईल, अश्या आशयाचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवविण्यात आले आहे निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अक्कलकुवा-धडगाव विधानसभा अध्यक्ष ॲड. रुपसिंग वसावे यांची स्वाक्षरी आहे.या निवेदनाची प्रत ना. श्री. गिरीश महाजन सो मंत्री ग्रामविकास विभाग, व श्री. एकनाथ डावले प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग,मा. मुख्य कार्यकारी अधिकारी सो..जि.प. नंदुरबार यांना पाठवविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!