नंदुरबार जिल्हा पोलीस दल तर्फे कलाल समाज नवयुवक मंडळाच्या शांतते व शिस्त पूर्ण मिरवणूक व वेळेवरती गणरायाचे विसर्जन केल्याबद्दल सत्कार.

*नंदुरबार जिल्हा पोलीस दल तर्फे कलाल समाज नवयुवक मंडळाच्या शांतते व शिस्त पूर्ण मिरवणूक व वेळेवरती गणरायाचे विसर्जन केल्याबद्दल सत्कार…* कलाल समाज नवयुवक मंडळाच्या नंदुरबार येथे दि 14/09/2023 रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस दल गणेशोत्सव सन :- 2022 वर्षाच्या नंदुरबार येथे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी मिरवणूक शांतते पूर्ण वातावरणात शिस्तीत तसंच वेळेवरती गणरायाचे विसर्जन केल्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मा. ना.डॉ. विजयकुमार गावित साहेब (मंत्री आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री, नंदुरबार जिल्हा ) तसेच मा.श्री. बी. जी. शेखर पाटील (भा. पो. से ) ( विशेष पोलीस महानिरीक्षक. नाशिक परीक्षेत्र ) यांचा शुभहस्ते मंडळाला ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देऊन मंडळाचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी कलाल समाज नवयुवक गणेश मंडळ अध्यक्ष चि.उमेश भैय्या विजयसा सोनवणे व 2022 कार्यकारिणीचे सचिव श्री.धीरज महेंद्रसा कलाल यांनी मंडळातर्फे सत्कार स्वीकारला. याप्रसंगी कलाल समाज नवयुवक मंडळ अध्यक्ष उमेश भैय्या विजयसा सोनवणे म्हणाले की, यावर्षी सुद्धा आमच्या मंडळ शांततेत व चांगले समाज उपयोगी उपक्रम रक्तदान शिबिर,नेत्र तपासणी शिबिर , समाज प्रबोधनमय जनजागृती जनरल नॉलेज स्पर्धा घेणार आहे. या कार्यक्रमाला समाजाचे सर्व तरुण मंडळी तसेच आमची कार्यकारणी ही नेहमी उस्फूर्तपणे सोबत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!