शिवसेना (उ.बा.ठा.) गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, कार्यकर्ते व रेल्वे राज्यमंत्री मा. ना. रावसाहेब दानवे पाटील सह शिंदखेडा मतदार संघाचे आमदार जयकुमार रावल यांच्यात दोंडाईचा रेल्वे स्टेशन येथे राडा*

*शिवसेना (उ.बा.ठा.) गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, कार्यकर्ते व रेल्वे राज्यमंत्री मा. ना. रावसाहेब दानवे पाटील सह शिंदखेडा मतदार संघाचे आमदार जयकुमार रावल यांच्यात दोंडाईचा रेल्वे स्टेशन येथे राडा*( प्रतिनिधी गोपाल कोळी )दोंडाईंचा ता.शिंदखेडा शिवसेना (उ.बा.ठा.) गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मा.ना.रेल्वे राज्यमंत्री,कोळसा व खान मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांना दोंडाईचा शहरातील दाऊळ रस्त्यावरील रेल्वे गेट हे सतत दर १५/२० मिनींटानी बंद होत असते व या रेल्वे गेट मार्गाने दाऊळ,मंदाणे,झोतवाडे,शेंदवाडे,साहुर,तावखेडा प्र. न. व सिंधीकाॅलनी सह जुने शहादा रोडवरील रहीवासी व शालेय विद्यार्थी या रेल्वे गेट मार्गाने प्रवास करीत असतात. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थीना तसेच शेतकऱ्यांना शेतमाल किंवा शेती उपयोगी खते वाहतूक करण्यास व आजारी रुग्णांना घेऊन जाण्यासाठी सतत गेट बंद होत असल्याने खुप त्रास होत आहे यात अनेक रुग्णांना दवाखान्यात नेत असताना प्राण देखील गेले आहेत त्यासाठी दाऊळ रस्त्यावर उड्डाण पूल किंवा भुयारी मार्ग रस्ता लवकरात लवकर मार्गी लाऊन तयार करुन द्यावा तसेच ज्या प्रमाणे खान्देश एक्स्प्रेस रेल्वे सुरत मार्गी चालु केली आहे त्याच प्रमाणे नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, जळगाव कडून चाळीसगाव मार्ग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे सुरू करावी कारण की खान्देशातील लोक जास्त करुन कल्याण, भिवंडी,ठाणे, खारेगाव,कळवा, बदलापूर व पनवेल या विभागात राहतात व सुरत मार्गी रेल्वे ने जाण्यासाठी खुप अडचण निर्माण होते जर का एक रेल्वे नंदूरबार, अमळनेर, जळगाव, चाळीसगाव मार्ग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चालू केली तर जास्त सोईचे होईल म्हणून एक रेल्वे जळगाव, चाळीसगाव मार्ग चालु करावी या संदर्भात शिवसेना उ. बा. ठा. गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व कार्यकर्ते दोंडाईचा रेल्वे स्टेशन येथे निवेदन देण्यासाठी तब्बल दोन तास ठिय्या मांडून बसले होते त्यावेळी मा. ना. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील हे त्याठिकाणी आले असता निवेदन देण्यासाठी सनदशीर मार्गाने शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व कार्यकर्ते पुढे आले त्यावेळी शिंदखेडा मतदार संघाचे आमदार जयकुमार रावल यांनी कार्यकर्त्यांना व शानाभाऊ सोनवणे यांना धक्का दिला असल्यामुळे राडा झाला व शिवसैनिकांनी घोषणा दिल्या कि शेतकऱ्यांना साले बोलणारे रावसाहेब दानवे पाटील यांच्या बैलाला भो, या धक्काबुक्की करणारे आमदार जयकुमार रावल च्या बैलाला भो,नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी, शेतकऱ्यांना साले बोलणारे मत्री नकोत आम्हाला शेतकऱ्यांचे हित जोपासणारे मत्री हवेत आम्हाला अशा घोषणा दिल्या त्यावेळी काही वेळ पर्यंत तणावाचे वातावरण तयार झाले असल्याने दोंडाईचा शहर पोलीसांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, जिल्हा उपसंघटक कल्याण बागल,उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार, उपशहरप्रमुख आबा चित्ते, मनोज परदेशी,राज ढोले,किरण सावळे यांना अटक करून दोंडाईचा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!