*भेलके महाविद्यालयात मतदार नोंदणी अभियान संपन्न* पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शंकरराव भेलके महाविद्यालय नसरापूर, येथील महाविद्यालयामध्ये मतदाराची नोंदणी अभियान घेण्यात आले. तहसीदार कार्यालय , विद्यार्थी विकास मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे हे अभियान झाले. यावेळी महाविद्यालयातील अठरा वर्ष पुर्ण झालेल्या नवमतदारांची नोंदणी करण्यात आली. यावेळी ऑनलाइन मतदान नोंदणी कशी करावी? नोंदणी साठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? यासंबंधीची माहिती राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. जाधवर दयानंद यावेळी दिली. कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. तुषार शितोळे, विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी डॉ हिमालया सकट, रा.से.यो अधिकारी डॉ जगदीश शेवते, कार्यालयीन अधीक्षक श्री विकास ताकवले, डॉ. सचिन घाडगे, डॉ. राजेंद्र सरोदे, प्रा. माऊली कोंडे, प्रा महेश कोळपे, प्रा.ऋतुजा साळुंखे, कार्यालयातील कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
भेलके महाविद्यालयात मतदार नोंदणी अभियान संपन्न*
