नेर: अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धुळे तालुका निवेदन आढावा बैठक संपन्न: नेर: अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धुळे तालुका आढावा बैठक व निवेदन देणे संदर्भात जेष्ठ नागरिक भवन संतोषी माता चौक धुळे. येथे सर्व धुळे तालुक्यातील तमाम समता सैनिक,पदाधिकारी व ओबीसी बांधवांना बोलविण्यात आले होते आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धुळे तालुका विस्तारीकरण संदर्भात वेगवेगळ्या पद वाटपाच्या व नवयुकांना बांधीलकिने जबाबदारी स्वीकारण्याच आव्हान देखील समता परिषद जिल्हाध्यक्ष श्री राजेशजी बागुल यांनी केले. आणि नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम झाला. जिल्हाध्यक्ष राजेशजी बागुल यांना कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान देऊन तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सचिव श्री बापू महाजन ज्येष्ठ सल्लागार, प्राध्यापक अण्णा माळी सर, प्रा.अनिलजी बोरसेसर, ओबीसी नेते दिलीप देवरे, सत्यशोधक जिल्हाअध्यक्ष राजकिशोरजी तायडे, लोकक्रांती नेते बी एन बिरारी,यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्याचप्रमाणे धुळे तालुकाध्यक्ष उमाकांत खलाणे आणि कार्याध्यक्ष आबा पगारे यांनी बैठकीचे आयोजन केले होते, व तालुक्यातील सर्व नियुक्तीपत्र वाटप केले. बैठकीतले महत्वपूर्ण विषय.1)धुळे तालुका विविध पदांवरील नियुक्तीपत्र वाटप.2) ओबीसी आरक्षण बाबत चर्चा.3) जिल्हाधिकारी साहेब यांना ओबीसी आरक्षणात धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. असे निवेदन देण्यात यावे आणि हा सर्वांमध्ये ठराव मंजूर करण्यात आला आणि त्याबाबतचे पत्र देखील माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आले.
Related Posts
आश्रम शाळा विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या केल्याने एकच खळबळ
*आश्रम शाळा विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या केल्याने एकच खळबळ*नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील कोटली आश्रम शाळेतील एका विद्यार्थिनी गळफास घेऊन आत्महत्या…
झोतवाडे येथे एक गाव एक गणपतीची स्थापना;जि.प.शाळकरी विद्यार्थ्यांकडून आरती
*नेर:* *झोतवाडे येथे एक गाव एक गणपतीची स्थापना;जि.प.शाळकरी विद्यार्थ्यांकडून आरती:* *नेर:* शिंदखेडा तालुक्यातील झोतवाडे गावात महर्षी वाल्मिकी ऋषी मंदिराच्या सभामंडपात…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यां केशरानंद जिनींग येथे कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यां केशरानंद जिनींग येथे कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्नदोंडाईचा प्रतिनिधी गोपाल कोळीदोंडाईचा- ता. शिंदखेंडा दि.8 रोजी केशरानंद जिनींग येथे…