नेर येथील कारागीर गणपती मूर्ती बनवण्यात व्यस्त

*नेर:* *नेर येथील कारागीर गणपती मूर्ती बनवण्यात व्यस्त:* *नेर:* धुळे तालुक्यातील नेर येथील गणेशमूर्ती घडविणारे कारागीर आपल्या कामात मग्न असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच ऐन 3,4 दिवसावर गणपती बाप्पा चे आगमन असून नेर येथील अनेक मूर्तिकार आपले काम आता जोमाने करीत आहेत.तसेच नेर येथील शाम कला आर्ट. हे कारागीर वर्षांनु वर्षांपासून गणेशमूर्ती तयार करणारे कारागीर वाल्मीक जगदाळे,शाम जगदाळे हे दोन्हीं भाऊ अत्यंत गुणी मूर्तिकार आहेत.त्यानंतर या कलेची धुरा आधीपासूनच या व्यवसायात यशस्वीरित्या पार पाडत आहेत. तसेच नऊ इंचापासून दहा फुटांपर्यंत अशा जवळपास मुर्ती तयार करण्यात येतं आहेत.तसेच वेगवेगळ्या स्वरूपात अधिक मूर्ती तयार करतात. सातशे ते आठशे ग्राहक हे वर्षानुवर्षे मूर्ती खरेदी करणारे असून ३०० रुपयांपासून ते ३० हजारांपर्यंत मूर्ती येथे तयार होत असतात.सुबक रंगकाम, आकर्षक रंगसंगती,नवनवीन मूर्ती व उत्तम स्वभाव यामुळे नेर येथील मूर्ती कारखान्यात ग्राहक मूर्ती खरेदी जास्तीत जास्त करीत असतात.अशाच हजारोच्या संख्येने मूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे. अन्य मूर्तिकारही मूर्तिकलेत व्यग्र आहेत.तसेच पीओपीच्या मूर्ती तयार करणे मातीच्या मूर्तीपेक्षा सोयीचे असते म्हणून आम्ही इतक्या मोठ्या संख्येने मूर्ती तयार करू शकतो.पीओपी बंदी आल्यास मातीच्या मूर्तीमध्ये नवीन तंत्र वापरून आम्ही मूर्ती तयार करू शकतो.गणेशोत्सवाची चाहूल लागताच गणपती मूर्ती तयार करण्याच्या कामास वेग आला आहे. विविध लहान- मोठ्या मूर्ती साकारण्याच्या कामात कारागीर मग्न दिसून येत आहेत. यंदा उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार असल्याने मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.या महिन्याच्या १९ सप्टेंबर ला गणेश चतुर्थी असून, गणेशोत्सवाची सुरवात होणार आहे. गेली दोन,तीन वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे उत्साहात गणेशोत्सव साजरा झाला नाही. उत्सव साजरा करण्यावर विविध प्रशासकीय बंधने होती. त्यामुळे यंदा गणेशोत्सव उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा होणार आहे. भाविकांप्रमाणेच मूर्ती बनविणाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बहुतांशी प्रमाणात मूर्ती तयारही झाल्या आहेत. त्यांच्या रंगरंगोटीच्या कामात महिला व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत. असे असले, तरी मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चामाल अर्थात प्लॅस्टर ऑफ पॅरिस व रंगांच्या दरांमध्ये सुमारे बऱ्याच प्रमाणात टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मूर्तीच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता कारागीरांकडून व्यक्त करण्यात आली.शॅडो मातीच्या दरात सुमारे ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. नेहमीच्या विक्रेत्यांकडून गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यंदा १५ टक्के अधिक मागणी करण्यात आल्याचेही विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. राखी पौर्णिमेपर्यंत मूर्तीचे काम पूर्ण होऊन त्यांची बुकिंग सुरूकरण्यात आली आहे.यावेळी असल्याचेही सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!