जयकुमारचा एक चमचा दोंडाईचाकरांना खोटी माहिती देऊन दिशाभूल करणे बरे नव्हे
( दोंडाईचा प्रतिनिधी गोपाल कोळी ) दोंडाईचा ता. शिंदखेडा जुने शहादा रस्ता किंवा दाऊळ रस्त्यावर भुयारी मार्ग व्हावा यासाठी शानाभाऊ सोनवणे यांनी चार वर्षांपूर्वी रेल रोको आंदोलन केले होते त्या संदर्भात अजूनही उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग झाला नाही म्हणून केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे आपल्या भागात येत असल्या मुळे त्यांना आपण निवेदन द्यावे असे शिवसैनिकांनी ठरवले.दि.१५/९/२०२३ रोजी रावसाहेब दानवे हे दोंडाईचा रेल्वे स्टेशनला नियोजित वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता येणार होते परंतु त्यांना येण्यास उशीर झाला म्हणून शिवसेनेचे शानाभाऊ सोनवणे सह सर्व पदाधिकारी दीड तासापासून उभे होते. गुडघे दुखायला लागल्यामुळे रेल्वे स्टेशनच्या बाहेर ग्राउंड वर खाली बसून घेतले तेव्हा पी आय श्रीराम पवार यांनी फोन केला होता त्यांना शानाभाऊंनी सांगितले की केव्हाचे उभे आहोत म्हणून गुडघे दुखायला लागल्याने खाली बसलो आहोत फक्त दानवे साहेब आले का निवेदन बाहेरच्या बाहेर देऊन निघून जाऊ तेव्हा कृष्णा नगराळे ही तेथे आले शैलेश सोनार व शानाभाऊनी त्यांनाही तेच सांगितलं मग लगेच रावसाहेब दानवे तिथे आले तेव्हा निवेदन देण्यासाठी पुढे गेले असता कल्याण बागल यांना जयकुमार रावळांनी जोरात धक्का दिला नंतर शानाभाऊ पुढे सरकले त्यांनाही धक्का मारून हाड रे, थांब रे तिकडे असे अपमानित केले म्हणून पुढील घटना घडली ही घटना संपूर्ण रेकॉर्ड झाली आहे व लोकांपर्यंत पोहोचली सुध्दा आहे. जयकुमार रावल यांच्या पगारी चमच्याने पोस्ट टाकताना सांगितले आहे की निवेदन दिल्यानंतर घोषणाबाजी केली मग निवेदन देण्याचे फोटो त्यांनी लोकांसमोर आणावेत नाहीतर रावलांचा पगारी चमचा म्हणून खोटी माहिती देऊ नये. आरे! असे अनेक आंदोलन शानाभाऊंनी करून लोकांना न्याय मिळवून दिला आहे. शानाभाऊंनी जिल्हा परिषद चा भ्रष्टाचार बाहेर काढला. त्यांनी पंचायत समितीचे सर्व महत्त्वाचे अधिकारी प्रभारी आहेत असा आवाज उठून तुमचे पितळ उघडे केले म्हणून तुमची फाटली एवढेच काय तर तुमचे नेते स्वतःच्या वाढदिवसाला बाया नाचवतात शानाभाऊ स्वतःच्या वाढदिवसाला शेतकऱ्यांसाठी पाच दिवसांचे उपोषण करतात. हा फरक आहे तुमच्या नेत्यात आणि शानाभाऊं मध्ये अरे स्टंटबाजी कोणाला म्हणतात गल्ली ते दिल्ली तुमची सत्ता असताना तालुक्याचे आमदार, खासदार तुमचे असताना भाजपाचा जिल्हाध्यक्ष सिंदखेडा तहसीलदारांवर मोर्चा काढतो, दोंडाईचा पोलीस स्टेशनवर मोर्चा काढतो, बाम्हणे सबस्टेशनवर शेतकऱ्यांना घेऊन भाजपाचा पदाधिकारी निवेदन देतात तेव्हा लोकांसमोर हसू होत त्याला म्हणतात स्टंटबाजी, पुढे शानाभाऊं बद्दल खोटी माहिती दिली तर तुमचे अजून पितळ उघडे पाडू असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.